Kissing In Car: जोडीदाराला गाडीमध्ये किस करणं बेकायदेशीर? जाणून घ्या काय सांगतो कायदा

Kissing Inside Car: कारमध्ये किस केल्याप्रकरणी अनेकदा पोलीस कारवाई करतात. कधी कधी या प्रकरणी अटक देखील केली जाते. मात्र खरंच असं करणं गुन्हा आहे का? चला जाणून घेऊयात.

Updated: Dec 6, 2022, 02:55 PM IST
Kissing In Car: जोडीदाराला गाडीमध्ये किस करणं बेकायदेशीर? जाणून घ्या काय सांगतो कायदा title=

Rules For Kissing Inside Car: कारमध्ये किस केल्याप्रकरणी पोलीस कपल्सवर कारवाई करतात. अनेकदा कपल्सना अटक देखील केली जाते. चौपाट्या, सी-फेस, गार्डन आणि इतर सार्वजनिक ठिकाणी अल्शील कृत्य केल्या प्रकरणी पोलीस कारवाई करतात. अनेकदा मुलामुलींना समज देऊन सोडलं जातं. तर काही वेळेस अश्लील कृत्य केल्याप्रकरणी कारवाई केली जाते. मात्र असं करणं खरंच गुन्हा आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण किस प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा कोणताही कायदा नाही. पण भारतीय दंड संहितेनुसार 294 या कलमाच्या आधारे कारवाई केली जाऊ शकते. चला जाणून घेऊयात हे कलम कसं लागू होतं ते...

आयपीसी कलम 294

भारतीय दंड संहितेतील कलम 294 नुसार, एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृती करत असेल आणि तिथल्या लोकांना अश्लील असल्याची तक्रार केली तर पोलीस कारवाई करू शकतात. भारतीय दंड संहिता कलम 294 आधारे हा गुन्हा आहे. संबंधित व्यक्तींना या कृतीसाठी दोषी धरलं जाईल आणि दंड ठोठावला जाईल. या कलमाअंतर्गत गुन्हा जामीनपात्र आहे. म्हणजेच अटक केलेल्या व्यक्तींची जामिनावर सुटका होऊ शकते. दुसरीकडे जामिन न मिळाल्यास दोषीला 3 महिन्यापर्यंत शिक्षा होऊ शकते. आर्थिक दंड की शिक्षा हे आरोपीच्या पार्श्वभूमीवर निर्धारित केलं जाऊ शकतं. 

बातमी वाचा- Gold ATM: आता एटीएममधून मिळणार सोनं, मशिन कशी काम करते जाणून घ्या

काय आहे वकिलांचं म्हणणं...

दिल्ली हायकोर्टाचे वकील आनंद कटियार यांनी सांगितलं की, 'गाडी सार्वजनिक ठिकाणी असेल आणि आसपास लोक असतील. तेव्हा कपल कारमध्ये किस करत असेल, आणि आसपासच्या लोकांनी तक्रार केली तर हे अश्लिल मानलं जातं. भारतीय दंड संहितेच्या कलम 294 अंतर्गत हा गुन्हा मानला जाईल. मात्र यानंतर काही बाबी लक्षात घेऊनच गुन्हा दाखल केला जातो.'