LPG Cylinder Price Hike: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 1 डिसेंबर 2024पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. 1 डिसेंबर 2024 पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दर वाढले आहे. इंडियन ऑइलने दिलेल्या माहितीनुसार, 19 किलोंच्या LPG गॅस सिलेंडरची किंमत 16.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
दिल्लीत 19 किलोंच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 1818.50 रुपयांवर पोहोचली आहे. मागील महिन्यात या सिलेंडरच्या किंमतीत 62 रुपयांची वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये 19 किलोंचा व्यावसायिक सिलेंडर 1740 रुपयांवर मिळत होता. हा सलग पाचवा महिना आहे जेव्हा सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडर 14.2 किलोंच्या दरात कोणतीही वाढ झाली नाहीये.
कोलकत्ताः 1927.00
मुंबईः1771.00
चेन्नईः 1980.50
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम हॉटेल आणि रेस्तराँतील जेवणावर पडणार आहे. त्यामुळं हॉटेलमधील जेवण महागणार आहे. वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चटका बसला आहे.
सरकारी तेल कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG गॅस सिलेंडरच्या किंमतींचे परीक्षण करण्यात येते. या महिन्यात व्यवसायिक गॅस सिलेंजरच्या किंमतीत 16.50 रुपयांची वाढ झाली आहे.
1 नोव्हेंबर रोजी 62 रुपयांची वाढ
1 ऑक्टोबर रोजी 48.50 रुपयांची वाढ
1 सप्टेंबर रोजी 39 रुपयांची वाढ
1 ऑगस्ट रोजी 6.50 रुपयांची वाढ
घरगुती गॅस सिलेंडर 14.2 किलोंच्या गॅस सिलेंडरच्या किंमती स्थिर असून त्यात कोणताही बदल झालेला नाहीये.
दिल्लीः 803.00
कोलकाताः 829.00
मुंबईः 802.50
चेन्नईः 818.50
दरम्यान, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना घरगुती गॅस सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी दिली जाते. ही सबसिडी वर्षांतून 12 सिलेंडरवर मिळते. या सिलेंडरच्या किंमतीत 1 ऑगस्ट 2024 पासून कोणताच बदल झालेला नाहीये.