सचिनला दुखापत, आज एमआरआय चाचणी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर काल खेळलेल्या वन डे मॅचमध्ये त्याला दुखापत झाल्याचे समजते. सचिनच्या डोळ्याला दुखापत झाली असल्याचे सुत्रांकडून समजते. त्यामुळे सचिनची आज एमआरआय चाचणी करण्यात येणार आहे.

Updated: Feb 20, 2012, 12:48 PM IST

www.24taas.com, ब्रिस्बेन

 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर काल खेळलेल्या वन डे मॅचमध्ये त्याला दुखापत झाल्याचे समजते. सचिनच्या डोळ्याला दुखापत झाली असल्याचे सुत्रांकडून समजते. त्यामुळे सचिनची आज एमआरआय चाचणी करण्यात येणार आहे. ब्रिस्बेन वन-डेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना सचिन तेंडुलकरच्या हेल्मेटवर ब्रेट लीचा एक वेगवान बॉल आदळला होता.

 

ब्रेट लीचा एक उसळलेला चेंडू सचिन पुल करण्याचा प्रयत्न केला होता. पण सचिनचा अंदाज चुकल्याने चेंडुचा जोरदार फटका त्यांचा हेल्मेटवर बसला. पण त्यामुळे त्याच्या डोळ्याला इजा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसचं सचिनच्या डोळ्याला सुज आल्यामुळे टीम मॅनेजमेंटने झालेल्या दुखापतीची गंभीर दखल घेत, सचिनची एमआरआय स्कॅन करण्याचा निर्णय घेतला.

 

टीममधील एक सिनिअर प्लेअर असलेला सचिन या ऑसी दौऱ्यात भारताचा महत्त्वाचा प्लेअर आहे. ट्रायंग्युलर सीरिजमधील भारताची लंकेशी होणारी पुढची मॅच मंगळवारी आहे. त्यामुळे या मॅचमध्ये सचिन खेळणार की नाही याबाबत एमआरआय स्कॅनचा रिपोर्ट आल्यानंतरच टीम मॅनेजनमेंट निर्णय घेईल.