7 मुलींनी केले आईवर अंत्यसंस्कार

वर्षानुवर्ष चालत आलेल्या रुढी परंपरांना छेद देत रत्नागिरीतल्या कर्ला गावातल्या सात बहिणींनी अनोखा आदर्श समाजासमोर ठेवलाय. 85 वर्षांच्या सरस्वती बापट या आपल्या आईवर या सात मुलींनी अंत्यसंस्कार केलेत. तिरडी उचलण्यापासून ते अग्नीडाग देण्यापर्यंत सर्व अत्यंसंस्काराचा विधी या मुलींनी केलाय.

Updated: Dec 26, 2015, 10:08 PM IST
7 मुलींनी केले आईवर अंत्यसंस्कार title=

रत्नागिरी : वर्षानुवर्ष चालत आलेल्या रुढी परंपरांना छेद देत रत्नागिरीतल्या कर्ला गावातल्या सात बहिणींनी अनोखा आदर्श समाजासमोर ठेवलाय. 85 वर्षांच्या सरस्वती बापट या आपल्या आईवर या सात मुलींनी अंत्यसंस्कार केलेत. तिरडी उचलण्यापासून ते अग्नीडाग देण्यापर्यंत सर्व अत्यंसंस्काराचा विधी या मुलींनी केलाय.

विशेष म्हणजे या पंरपरेला बगल देणाऱ्या कृत्याला गावकऱ्यांनीही साथ दिली. आईने सुद्धा मरण्यापुर्वी आपल्यावर अंत्यसंस्कार मुलींनी करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. ससस्वती बापट यांचे पती विनायक बापट हे लष्करात होते. मुलगा नसल्याचं कधी खंत त्यांनी व्यक्त केली नाही. बापट दाम्पत्यानं आपल्या मुलींना मुलाप्रमाणे वाढवलं. पतीचं निधन झाल्यावर सरस्वतीबाईंनी आपल्या सात मुलींना शिस्त आणि संस्कारात वाढवलं.