'ऊर्जा विभागातल्या कंत्राटी कामगारांनी संपावर जाऊ नये'

कंत्राटी कामगारांचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. 

Updated: May 22, 2017, 11:15 AM IST
 'ऊर्जा विभागातल्या कंत्राटी कामगारांनी संपावर जाऊ नये' title=

मुंबई : ऊर्जा विभागातल्या कंत्राटी कामगारांनी संपावर जाऊ नये असं आवाहन, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. कंत्राटी कामगारांचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं.

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तीनही कंपनीतले सुमारे २२ हजार कंत्राटी कामगार, मध्यरात्रीपासून संपावर जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्र्यांनी हे आवाहन केलं आहे. दरम्यान राज्यात सध्या भारनियमन नाही. 

तसंच कामगार संपावर गेल्यास ऊर्जा विभागाकडे पर्यायी व्यवस्था असल्याचंही बावनकुळे म्हणाले, तसंच रस्त्याच्या खोदकाम किंवा इतर विकासकामांमुळे महावितरणची केबल तोडल्यास कंत्राटदार किंवा संबंधित यंत्रणेवर आता पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.