मुंबईकर आज साजरा करणार वडापाव डे!

व्हॅलेंटाईन्स डे, मदर्स डे, फ्रेंडशिप डे आणि डॉक्टर्स डे यासारखे विविध डे आपल्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तींची आठवण करून देतात. मात्र या सगळ्यात आपण बऱ्याच लहान सहान गोष्टी नकळत विसरून जातो. अशा नकळत राहून गेलेल्या गोष्टींची हक्कानं आठवण करून देणारा एक विशेष दिवस म्हणजे ‘वडापाव डे’.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 23, 2013, 06:51 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
व्हॅलेंटाईन्स डे, मदर्स डे, फ्रेंडशिप डे आणि डॉक्टर्स डे यासारखे विविध डे आपल्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तींची आठवण करून देतात. मात्र या सगळ्यात आपण बऱ्याच लहान सहान गोष्टी नकळत विसरून जातो. अशा नकळत राहून गेलेल्या गोष्टींची हक्कानं आठवण करून देणारा एक विशेष दिवस म्हणजे ‘वडापाव डे’.
वडापाव लाखो मुंबईकरांचं पोट भरतो. त्यामुळं मुंबईकर गेल्या बारा वर्षांपासून २३ ऑगस्ट रोजी ‘वडापाव डे’ साजरा करीत आहेत. या दिवसाची संकल्पना अगदी सरळ सोपी अशी आहे. तुम्ही फक्त इतकंच करायचंय की या दिवशी किमान एक वडापाव तरी नक्की घ्यायचा. तसंच हवं असल्यास तुमच्यासाठी प्रेरक ठरणाऱ्या व्यक्तीला वडापाव देऊन त्यानं किंवा तिनं तुम्हाला आतापर्यंत जी काही मदत केली आहे त्याबद्दल आभार मानू शकता.
वडापाव डे ही अनोखी संकल्पना मुंबईत रुजवणारे धीरज गुप्ता म्हणतात, मुंबई शहरामध्ये दररोज २० लाखांपेक्षा अधिक वडापावांची विक्री होते. तसंच प्रामुख्यानं सामान्य व्यक्तींकडून या उत्पादनास जास्त मागणी असल्यामुळं वडापाव हे महानगरांमध्ये विशेष लोकप्रिय असलेलं उत्पादन आहे.
धीरज यांनी वडापाव डे हा दिवस साजरा करताना नेहेमीच अनेक वलयांकित व्यक्तींना या सोहोळ्यात सहभागी करून घेतलंय. रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, आर. माधवन पासून सचिन तेंडुलकर, प्रशांत दामलेपर्यंत तसेच अनुराग कश्यप पासून ते राजस्थानमधील तरूण सरपंच छवी राजावत यांच्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीने मनापासून मान्य केलंय की मुंबईत होत असलेला हा वडापावसारखा झट-पट आणि रुचकर पदार्थ त्यांनाही प्रचंड आवडतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.