www.24taas.com, नवी दिल्ली
सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्याची मालिका सुरू असून आज त्यांनी भारताचा स्वीस बँकेतील काळ्या पैशाचा काही लेखाजोखा मांडला यात त्यांनी मुकेश अंबानी, अनिल अंबांनी, काँग्रेसला टार्गेट केले आहे.
भारतातील सुमारे ७०० जणांचे ६००० कोटी रुपयांचा काळा पैसा परदेशी बँकांमध्ये जमा असल्याचा खळबळजनक खुलासा इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या अरविंद केजरीवाल यांनी आज केला आहे. स्वीस बँकेत किती काळा पैसा आहे याबद्दल अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. सीबीआयचे विद्यमान संचालकांच्यामते सुमारे २५ लाख कोटी रुपये स्वीस बँकेत काळा पैसा म्हणून जमा आहे.
यावेळी त्यांनी स्वीस बँकेमध्ये जमा असलेल्या काळ्या पैशाबद्दल खुलासा केला. यात काही भारतायांचे नावे घेतली. कोट्यवधी रुपये स्वीस बँकेत जमा करण्यात आली असून हा काळा पैसा आहे. तो भारतात आणता येऊ शकतो, असाही दावा त्यांना यावेळी केला. परंतु, भारत सरकारचीच हा पैसा आणण्याची इच्छा शक्ती नसल्याचेही त्यांना यावेळी सांगितले.
सुमारे ७०० भारतीयांचे ६ हजार कोटी रुपये केवळ स्वीस बँकेत जमा असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. ही माहिती भारत सरकारकडे गेल्या जुलै २०११पासून असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हे आहेत काळ्या पैशाचे मालक
स्वीस बँकेत उद्योगपती अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांचे प्रत्येकी १०० कोटी रुपयांचा काळा पैसा आहे. एव्हढंच नाही तर कोकीलाबेन अंबानी यांचंदेखील स्वीस बँकेत खातं आहे. नरेश गोयल यांचे ८० कोटी, सतीश टंडन यांचे १२५ कोटी अनु टंडन यांचे २५ कोटी स्वीस बँकेत जमा आहे.
हाँगकाँग अॅन्ड शांघाय बँकेची मदत
तसेच जिनिव्हाच्या एचएसबीसी शाखेत ७०० भारतीयांचे खाते आहेत. आमच्याकडे स्वीस बँकेतील सर्व खातेदारांची यादी असल्याचाही दावा केजरीवाल यांनी केला आहे. यात दिवंगत धीरूभाई अंबानी यांचेही खाते असल्याचे सांगितले. स्वीस बँकेत खाते उघडणे खूप सोपे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
केजरीवालांचे दिवाळीपूर्वी फटाकेबाजी
नवी दिल्ली : केजरीवाल यांची पत्रकार परिषद | आणखी एक नवा गौप्यस्फोट |
स्वीस बँकेतला काळा पैसा भारतात येणं शक्य | पण, सरकार तो येऊ देणार नाही |
दिवंगत आयकर अधिकारी संदीप टंडन यांचे सव्वा कोटी रुपये स्वीस बँकेत |
अनिल अंबानी यांचेही स्वीस बँकेत शंभर कोटी रुपये |
मुकेश अंबानी स्वीस बँकेत प्रत्येकी शंभर कोटी रुपये |
कोकीळाबेन अंबानींचेही होते स्वीस बँकेत खाते
स्वीस बँकेत ज्या भारतीयांचा काळा पैसा आहे त्यापैकी काहींची ही नावं....
स्वीस बँकेत काळा पैसा ठेवणाऱ्यांची यादी भारत सरकारकडे - केजरीवाल
हवालाच्या माध्यमातून जमा केला जातो पैसा |
एचएसबीसी बँकेच्या माध्यमातून होतो पैशाचा व्यवहार |
जेट एअरवेजचे नरेश गोयल यांचे स्वीस बँकेत ८० कोटी |
काळ पैसा भारतात आणण्याची सरकारची इच्छा नाही |
कोकीला अंबानी, यशोवर्धन बिर्ला यांचंही स्वीस बँकेत खातं |
संदीप टंडन यांच्या पत्नी अनू टंडन या काँग्रेसच्या खासदार आणि राहुल गांधींच्या जवळच्या सहकारी |
दिवंगत आयकर अधिकारी संदीप टंडन यांचे सव्वा कोटी रुपये स्वीस बँकेत |
अनिल अंबानी यांचेही स्वीस बँकेत शंभर कोटी रुपये |
मुकेश अंबानी स्वीस बँकेत शंभर कोटी रुपये |