नदालला पुन्हा एकदा जागतिक अव्वल स्थान...

यंदाच्या वर्षी फ्रेंच खुल्या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा टेनिसपटू राफेल नदाल पहिल्यांदाच जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 22, 2017, 09:49 AM IST
नदालला पुन्हा एकदा जागतिक अव्वल स्थान...  title=

पॅरिस : यंदाच्या वर्षी फ्रेंच खुल्या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा टेनिसपटू राफेल नदाल पहिल्यांदाच जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला आहे. 

जुलै २०१४ मध्ये नदाल अव्वल स्थानावर होता. स्पेनचा हा ३१ वर्षीय टेनिसपटू नदालला मांडीतील दुखापतीमुळे माँट्रियल व सिनसिनाटी येथील स्पर्धामधून माघार घ्यावी लागली आहे. नदाल हा ऑगस्ट २००८ पासून १४१ आठवडे अव्वल स्थानावर होता. त्यानंतर झालेल्या दुखापतीमुळे नदाल त्रस्त होता. आस्ट्रेलियात झालेल्या  सिनसिनाटी चषक स्पर्धेत उपांत्य फेरीत त्याचा निक किर्गीयोसने पराभव केला. पुन्हा एकदा जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर आल्यामुळे त्याला देखील आश्चर्य वाटत आहे.

स्विजरलँडचा रॉजर फेडरर हा तिसऱ्या क्रमांकावर असून स्टॅनिस्लॉस वॉविरका हा चौथ्या क्रमांकावर आहेत. नोव्हाक जोकोव्हिच पाचव्या क्रमांकावर आहे.