...म्हणून अभिनेत्रीने केला 'बारटेंडिंग'चा कोर्स

अभिनेता अजय देवगणचा बहुप्रतिक्षित 'दे दे प्यार दे' चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

May 13, 2019, 16:24 PM IST

मुंबई : अभिनेता अजय देवगणचा बहुप्रतिक्षित 'दे दे प्यार दे' चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. तारीख जवळ येत आहे, आणि चित्रपटातील अनेक किस्से उलगडत आहेत. सध्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रकुल प्रित चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटासाठी रकुलने तब्बल ८ किलो वजन कमी केले. त्याचप्रमाणे बारटेंडिंगचे प्रशिक्षण देखील घेतले आहे.

1/5

आकिव अलीने 'दे दे प्यार दे' चित्रपटाचे दिग्दर्शन केले.  

2/5

हा चित्रपट प्रेम संबंधांवर आधारलेला आहे. चित्रपटात अजय आणि रकुल यांच्या नात्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रेमात वयाचं कोणत्याही प्रकारचं बंधण नसतं हे देखील चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

3/5

अभिनेत्री रकुल प्रित सोशल मीडियावर अपडेट राहून दैनंदिन जीवनातील घडामोडी तिच्या चाहत्यांना कळवत असते. रकुल तितक्याच उत्साहाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडींची माहिती सोशल मीडियावर अपडेट करत असते. 

4/5

रकुल प्रित चित्रपटात अजयच्या प्रेमिकेची भूमिका साकारणार आहे, तर दुसरीकडे तब्बू अजयच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे.   

5/5

भूषण कुमार, कृष्ण कुमार, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. १७ मे रोजी 'दे दे प्यार दे' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.