अमिषा पटेलची गाजलेली प्रेमप्रकरणं! आलिया भट्टच्या जवळच्या व्यक्तीशी जोडलं होतं नावं

Amisha Patel Birthday: कहो ना प्यार हैं या चित्रपटात अभिनेत्री अमिषा पटेल हिनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यामुळे सर्वत्र चर्चा होती ती म्हणजे हृतिक रोशन आणि अमिषा पटेल हिच्या केमेस्ट्रीची. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन 23 वर्षे झाली आहेत परंतु आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आहेत. 

गायत्री हसबनीस | Jun 09, 2023, 14:30 PM IST

Amisha Patel Birthday: बॉलिवूडमध्ये चर्चा रंगते ती म्हणजे रिलेशनशिप्सची आणि ब्रेकअपची. त्यातून अनेकांच्या लिंकअप्सच्याही चर्चा सुरू होतात. परंतु तुम्हाला माहितीये का यामध्ये अभिनेत्री अमिषा पटेलचेही नावं प्रचंड गाजले होते. त्यावेळी अमिषा सिंगल होती म्हणूनही तिची फारच चर्चा रंगली होती. परंतु त्यानंतर तिच्या अफेअरची आणि लिंकअपचीही चर्चा रंगली होती. 

1/5

गाजलेली अभिनेत्री

actress

2000 च्या सुरूवातीच्या काळात अनेक अभिनेत्रींचा अभिनय लोकप्रिय ठरला होता. त्यात अभिनेत्री अमिषा पटेलचीही प्रचंड क्रेझ होती. 'कहो ना प्यार हैं' या चित्रपटामुळे तिच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली होती. 

2/5

अनेक चित्रपट गाजले

movies

त्यानंतर तिचे अनेक चित्रपट हे गाजले. तिचा 'गदार' हा चित्रपटही गाजला. आता या चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावर्षी तो प्रदर्शितही होणार आहे. 

3/5

चित्रपटांबरोबर प्रेमप्रकरणंही गाजली

amisha patel love affairs

परंतु त्याचबरोबर तिची अनेक प्रेमप्रकरणंही गाजली होती. त्यामुळे तिची ही प्रेमप्रकरणंही बरीच चर्चेत राहिली होती. तेव्हा आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. आमिषा आज 48 वर्षांची झाली परंतु तिच्या फिटनेसबद्दल ती आजही ओळखली जाते. 

4/5

आलिया भट्ट्च्या जवळच्या व्यक्तीशी जोडलं नातं

alia bhatt

प्रिटी झिंटा या अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडशी तिचे नावं जोडले गेले होते. त्यानंतर सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड दिग्दर्शक विक्रम भट्टशीही तिचे नावं जोडले गेले होते. विक्रम भट्टशी असलेलं तिचं रिलेशनशिप हे सगळ्यात जास्त वादग्रस्त होते. 

5/5

या अभिनेत्याशीही जोडलं गेलं नावं

trending news

तिचे नाव चक्क रणबीर कपूरशीही जोडले गेले होते. त्यामुळे तिचीही बरीच चर्चा रंगली होती. सोबतच एका पाकिस्तानी अभिनेत्यालाही ती डेट करत होती.