स्त्री रुपातील गणेश मूर्ती असणारे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर; मशिदीप्रमाणे दिसणारे प्राचीन हिंदू मंदिर
मंदिराची रचना पारंपारिक असून अनेक मूर्त्या कोरण्यात आल्या आहेत. स्त्रीच्या वेशभूषेत गणपतीची मूर्ती हे विशेष आकर्षण आहे.
Bhuleshwar Temple Pune : पुण्याच्या पुरंदर येथील भुलेश्वर शिव मंदिर हे विलक्षण वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. मशिदीप्रमाणे दिसणारे हे मंदिर अत्यंत प्राचीन हिंदू मंदिर आहे. गोलाकार घुमट आणि मिनार यामुळे हे मंदिर एखाद्या मशिदी प्रमाणे दिसते. या मंदिरावर मुघल स्थापत्य शैलीची छाप दिसते. या शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.