मेळघाटात आढळले 'कलरफुल' बेडूक

नव्याने विविध आठ प्रजातीच्या "कलरफूल" बेडकांचे संशोधन

| Aug 07, 2020, 11:49 AM IST

अनिरुद्ध दवाळे, झी मराठी, अमरावती :  अमरावतीच्या गजानन वाघ या प्राध्यापकांचे मागील चार वर्ष केले संशोधन. सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत असलेल्या मेळघाटात मागील चार वर्षे संशोधन करून एका प्राध्यापकाने नव्या आठ प्रजातीच्या विविध रंगाच्या बेडकांचा शोध घेतला आहे. या मध्ये मेळघाटच्या जंगलात गजानन वाघ यांना विविध प्रजातिचे बेडक त्यांना आढळून आले.

ज्यामध्ये फर्ग्युसन टोड, हीलक्रिकेट फ्रॉग, पॅन्ट कलुओला, डोबसॉस बॉरोविंग फॉग या प्रजातीच्या बेडकांचे संशोधन करण्यात आले आहे. यापूर्वी २००५ मध्ये धुळतकर सर्वे ऑफ इंडिया या संस्थेने मेळघाटात विविध आठ प्रजातीच्या बेडकांचे संशोधन केले होते. 

1/4

नव्याने विविध आठ प्रजातीच्या "कलरफूल" बेडकांचे संशोधन

मेळघाटात आढळले कलरफुल बेडूक

त्यात आता पुन्हा नव्याने आठ बेडकांचे संशोधन झाल्याने आता मेळघाटातील विविध प्रजातीच्या १६ प्रकारच्या बेडकांची नोंद करण्यात आली आहे. प्रा गजानन वाघ हे अमरावतीच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयात राणी शास्त्र विभागात ते कार्यरत आहे. 

2/4

मेळघाटात आढळले कलरफुल बेडूक

मेळघाटात आढळले कलरफुल बेडूक

त्यांनी रेफटाईल अँमफीबिय कन्झर्वेशन नॅशनल हिस्ट्री या आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये त्यांचा विद्यार्थी हयात कुरेशी यांच्यासोबत नुकताच एक निबंध एक ऑगस्टला प्रकाशित केला आहे. 

3/4

मेळघाटात आढळले कलरफुल बेडूक

मेळघाटात आढळले कलरफुल बेडूक

 या निबंधामध्ये त्यांनी मेळघाट मध्ये आढळलेल्या आठ प्रजातीच्या  बेडकांची सूची त्यात केली आहे. पूर्वी 2005 ला धुळतकर सर्वे ऑफ इंडिया या संस्थेने मेळघाटात बेडकांचा सर्वे केला होता. तेव्हा आठ बेडकांचे संशोधन झाले होते.

4/4

मेळघाटात आढळले कलरफुल बेडूक

मेळघाटात आढळले कलरफुल बेडूक

त्यानंतर आता गजानन वाघ व त्यांचा विद्यार्थी हयात कुरेशी यांनी केलेल्या शोधामध्ये नव्याने आठ बेडकांचा शोध लागलेला आहे. ज्यामध्ये फर्ग्युसन टोड, हीलक्रिकेट फ्रॉग, पॅन्ट कलुओला, डोबसॉस बॉरोविंग फॉग समावेश आहे.