GANESH UTSAV 2023 : तुमच्या घरातील बाप्पा झी 24 तासवर; पाहा घरगुती गणपतींची विलोभनीय आरास आणि लाडके गणराय

जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.

Sep 24, 2023, 18:46 PM IST

GANESH UTSAV 2023 : जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.

1/10

अनिल विठ्ठल टिळेकर

 Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

अनिल  टिळेकरांनी गणपतीची मुर्ती शाडू मातीची तयार केली आहे,शिवाय त्यांनी बाप्पाचा इको फ्रेंडली देखावा साकारला आहे.तसेच त्यांनी पारंपरिक वाद्यांची सजावट करुन बाप्पाची स्थापना केली आहे. 

2/10

प्रथमेश गुजर

Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

बाल गोपाळ गणेश मित्र मंडळ ( काळेवाडी चा राजा ) परळ या मंडळाचे यंदा 31 वे वर्ष असून दरवर्षी हे मंडळ विविध प्रकारचे देखावे बनवत असतात. आणि यावेळी त्यांनी हिमालयाची प्रतिकृती सादर केली आहे .

3/10

अश्लेषा विष्णु असावले

Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

सध्या सगळीकडे भारताच्या यशस्वी चांद्रयान मोहिमेचा ट्रेंड गाजत आहे.यंदा गणेशोत्सवा दरम्यान भाविकांनी बाप्पासाठी चांद्रयान-3 चा देखावा केलाय.अश्लेषा विष्णु असावले यांनी देखील अप्रतिम प्रतिकृती साकारली आहे. 

4/10

शशिकांत सुभाषचंद्र पाटील

 Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

शशिकांत  पाटील यांनी  गणपती बाप्पाची सजावट उत्तराखंडमध्ये मध्ये असलेल्या प्रसिद्ध केदारनाथ मंदिराचे डेकोरेशन केले आहे. त्यामध्ये तेथील घरे कशा प्रकारची आहेत असेही त्यांनी दाखवले आहे. मंदिराच्या आजुबाजुचा परिसर त्यांनी दाखवला आहे.त्याचबरोबर तिथल्या नदीचेही वर्णन या सजावटीत दाखवण्यात आले आहे.  

5/10

पॉल कुटुंबीयांचा गणराय

Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

पॉल कुटुंबीयांना बालगणेशाचा अतिशय सुंदर देखावा केला आहे.बाप्पाचं ते लोभसवाणं रुप मनाला मोहुन टाकत आहे.गडकिल्यांवर भ्रमंतीसाठी बाप्पा गेले आहेत.असा हा देखावा करण्यात आला आहे.

6/10

शुभम भिमराव करकमकर

Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

सध्या सिमेंट कॉंक्रीटच्या जगात 'गावाचं गावपण' आणि 'घराचं  घरपण हरवलयं शुभम यांच्या देखाव्यात प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडत आहे.जुन्या घराचा देखावा करत त्यांच्या घरी बाप्पा विराजमान झाला आहे.

7/10

अभिषेक सोमवंशी

Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

रिध्दी म्हणजे समृद्धी, भरभराट म्हणजेच लक्ष्मीचे प्रतिक आहे. सिद्धी म्हणजे सरस्वती ही विद्या देवता..! त्या विद्येच्या जोरावर मिळणारी सिद्धी (योग सिद्धी) लक्ष्मी व सरस्वती ह्या दोन देवतांचे प्रतिक आहे.असं अभिषेक यांचं मत आहे,यंदा त्यांच्या बाप्पाची मूर्ती अतिशय विलोभनीय आहे.

8/10

विदुला वैद्य

Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

विदुला वैद्य  यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन खूप सुंदर रित्या केले, वेगवेगळया फुलांनी केलेली बाप्पाची मनमोहक आरास सजावट पाहा.  

9/10

अरविंद राजाराम बने, विरार

Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

नुकत्याच आपल्या देशाने चंद्रावर दक्षिण द्रुवावर चांद्रयान उत्तरवून इतिहास रचला त्याची आठवण जागृत करुन, व निसर्गाचा मान राखून  घरच्या घरी, एका  एका पुट्ट्याच्या  साहाय्याने इको फ्रेंडली, चांद्रयान च डेकोरेशन तयार केले आहे.

10/10

अर्चना मंदार प्रभुणे, पुणे

 Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

यंदा प्रभुणे परिवाराने बाप्पाचे आगमन चांद्रयान थिम सोबत केले आहे. तर या सोबत गौरीची सुंदर प्रतिमा देखील बघायला मिळत आहे.