Hockey World Cup : 'हे' पाच खेळाडू टीम इंडियाला वर्ल्ड कप जिकून देणार, जाणून घ्या

Hockey World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये (Hockey World Cup 2023) टीम इंडिया 48 वर्षाचा पदकांचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. टीम इंडियात हे 5 खेळाडू आहेत, जे हॉकी वर्ल्ड कप 2023 वर भारताचे नाव कोरू शकतात. हे खेळाडू कोण आहेत, हे जाणून घेऊयात. 

Jan 13, 2023, 18:54 PM IST

Hockey World Cup 2023 : हॉकी वर्ल्ड कप 2023 ला आज 13 जानेवारीपासून ओडिशातील भुवनेश्वर आणि राउरकेला या दोन शहरांमध्ये सुरूवात झाली आहे. या वर्ल्ड कपमध्ये (Hockey World Cup 2023) टीम इंडिया 48 वर्षाचा पदकांचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. टीम इंडियात हे 5 खेळाडू आहेत, जे हॉकी वर्ल्ड कप 2023 वर भारताचे नाव कोरू शकतात. हे खेळाडू कोण आहेत, हे जाणून घेऊयात. 

1/8

Hockey World Cup

हॉकी वर्ल्ड कप 2023 (Hockey World Cup 2023) मध्ये भारताचा पहिला सामना स्पेनशी होणार आहे. या सामन्यात भारतीय टीमचे नेतृत्व युवा हरमनप्रीत सिंह करणार आहे. हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली टीम कसा परफॉर्म करते हे पाहावे लागणार आहे. 

2/8

वर्ल्ड कपमध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंहसह असे 5 स्टार खेळाडू आहेत, ज्यांच्यावर भारताला विजेतेपद पटकावून देण्याची जबाबदारी असणार आहे. या खेळाडूंमध्ये आकाशदीप सिंह, मनप्रीत सिंह, मनदीप सिंह आणि पीआर श्रीजेश यांचा समावेश आहे.1975 मध्ये टीम इंडियाने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आता 48 वर्षानंतर भारताला पुन्हा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. भारताने जर वर्ल्ड कप जिंकला तर ते दुसरे विजेतेपद ठरणार आहे.

3/8

Hockey World Cup

भारताचा स्टार डिफेंडर हरमनप्रीत सिंह शेवटचा वर्ल्ड कप 2018 मध्ये खेळला होता. मात्र या वर्ल्डकपमध्ये त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. हरमनप्रीतने त्याच्या हॉकी कारकिर्दीत ऑलिम्पिक कांस्यपदक, ज्युनियर वर्ल्ड कप आणि आशिया चषक यांसारखे विजेतेपद पटकावले आहेत.

4/8

Hockey World Cup

भारतीय संघासाठी 200 हून अधिक हॉकी सामने खेळलेल्या आकाशदीप सिंहकडून फॅन्सना खूप आशा आहेत. 2012 मध्ये पदार्पण करणाऱ्या आकाशने 80 हून अधिक गोल केले आहेत. त्याला गोल मशीन देखील म्हणतात.     

5/8

Hockey World Cup

भारतीय फिल्ड हॉकीपटू मनप्रीत सिंह गेल्या वर्ल्ड कपमध्ये कर्णधार होता. मात्र यावेळी कर्णधारपदाचे दडपण त्याच्या खांद्यावर नसणार आहे. अशा परिस्थितीत तो मुक्तपणे खेळू शकणार आहे. कर्णधार म्हणून त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले.     

6/8

Hockey World Cup

भारतीय स्टार फॉरवर्ड मनदीप सिंहने गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये संघासाठी सर्वाधिक 13 गोल केले होते. प्रतिस्पर्धी खेळाडूंना फसवण्यात आणि पेनल्टी कॉर्नरच्या संधी हिसकावण्यात तो माहीर आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्याचा अनुभव खूप महत्त्वाचा ठरणार आहे.    

7/8

Hockey World Cup

भारतीय संघाचा स्टार गोलकीपर पीआर श्रीजेशही वर्ल्ड कपसाठी पूर्णपणे तयार दिसत आहे. मेन्स प्रो लीगमधील कामगिरीनंतर श्रीजेशला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले, मात्र ऑस्ट्रेलियन कसोटी मालिकेत त्याने दमदार पुनरागमन केले. जेव्हा जेव्हा मोठे सामने होतात तेव्हा श्रीजेश त्याचा उत्कृष्ट खेळ दाखवतो.         

8/8

Hockey World Cup

टीम इंडिया संघ :  गोलरक्षक: क्रिशन बी पाठक आणि पीआर श्रीजेश बचावपटू: हरमनप्रीत सिंह (कर्णधार), अमित रोहिदास, सुरेंदर कुमार, वरुण कुमार, जर्मनप्रीत सिंह आणि नीलम संजीप मिडफिल्डर: विवेक सागर प्रसाद, मनप्रीत सिंह, हार्दिक सिंह, नीलकांत शर्मा, शमशेर सिंह आणि आकाशदीप सिंह फॉरवर्ड्स: मनदीप सिंह, ललित उपाध्याय, अभिषेक आणि सुखजित सिंह पर्यायी खेळाडू: राजकुमार पाल आणि जुगराज सिंह