राहुल, लालू आणि ममता मुंबईतील ज्या हॉटेलमध्ये थांबलेत त्याचे एका दिवसाचे भाडे किती माहितीये का?

राहुल गांधी, सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये थांबले आहेत. याचं एका दिवसाचे भाडे एक लाखापेक्षा जास्त आहे. 

Aug 31, 2023, 17:16 PM IST

INDIA alliance Mumbai meeting : विरोधकांच्या इंडिया (I.N.D.I.A) आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक होत आहे.  राहुल गांधी, सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी मुंबईत दाखल झालेत. कलिना येथील ग्रँड हयात (Grand Hyatt Hotel)  हॉटेलमध्ये ते  थांबले आहेत. या हॉचेलचे एका दिवसाचे भाडे किती आहे जाणून घ्या.

1/11

मुंबईत ग्रँड हयातमध्ये आज आणि उद्या देशभरातले विरोधक एकत्र येणार आहेत. 28 राजकीय पक्षांचे 63 प्रतिनिधी इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

2/11

हॉटेलमध्ये  12 वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या आणि आठ प्रकारच्या अपार्टमेंट देखील आहेत. एका दिवसाचे भाडे 11,000 ते 14,500 रुपयांपर्यंकत आहे. टॅक्स सहित 12,980 ते 17,110 रुपये होतात. 

3/11

बेडरूम ग्रँड अपार्टमेंटचे भाडे 34,000 रुपये आहे. टॅक्ससहित 40,120 रुपये भरावे लागतात.

4/11

प्रेजिडेंशियल सुइटसाठी एका दिवसाचे भाडे  299,000 रुपये असून टॅक्ससहित 352,820  रुपये लागतात.

5/11

  डिप्लोमेटिक सुइटचे एका दिवसाचे भाडे 34,500 रुपये असून टॅक्ससहित 40,710 रुपये लागतात.

6/11

या हॉटेलमध्ये डिप्लोमेटिक सुइट, ग्रैंड एग्जीक्यूटिव सुइट, ग्रैंड सुइट किंग, प्रेसिडेंशियल सुइट, वेरांदा सुइट किंगसह अनेक स्पेशल रुम देखील आहेत. 

7/11

या हॉटेलमध्ये 548 खोल्या तसेच अनेक सर्व्हिस अपार्टमेंट आहेत. या हॉटेलमध्ये Soma, 55 East, Celini आणि China House असे चार मोठे रेस्टॉरंट्स देखील आहेत. 

8/11

10 एकरात पसरलेले हे हॉटेल 2004 मध्ये सुरू झाले.   Lohan Associates  या शिकागोच्या कंपनीने या हॉटेलचे इंटिरीयर बनवले आहे. 

9/11

ग्रॅण्ड हयात  हॉटेल हे मुंबईपासून अगदी जवळ आहे. यामुळे अनेक सेलिब्रेटी, परदेशी पाहुणे तसेच मोठे व्यावसिय नेहमी याट हॉलेला पसंती देतात. हे मुंबईतील सर्वात महागडे हॉटेल आहे. 

10/11

या बैठकीसाठी  ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये 200 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. 

11/11

राहुल गांधी, सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी  वाकोला येथील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये थांबले आहेत.