पाहा देशातील सर्वात Slow Train; तुम्हीही निसर्गाच्या सानिध्ध्यात करु शकता रोमँटिक प्रवास

Indian Railway : अशा या भारतीय रेल्वेच्या महाकाय जाळ्यात एक असा मार्गही आहे, जिथं धावणारी रेल्वे देशातील सर्वात कमी वेगानं धावणारी रेल्वे म्हणून ओळखली जाते.   

Jul 21, 2023, 13:04 PM IST

Indian Railway : भारतीय रेल्वेनं केला जाणारा प्रवास कोणासाठीही नवा नाही. अनेकांसाठी रेल्वेन केल्या जाणाऱ्या या प्रवासाशी असंख्य आठवणीही जोडल्या गेलेल्या असतात. तुमच्याही असतील.... 

 

1/7

Indian Railway

Indian Railway : अशा या भारतीय रेल्वेच्या महाकाय जाळ्यात एक असा मार्गही आहे, जिथं धावणारी रेल्वे देशातील सर्वात कमी वेगानं धावणारी रेल्वे म्हणून ओळखली जाते. 

2/7

Nilgiri Mountain Railway

आतापर्यंत तुम्हीही विविध ट्रेननं प्रवास केला असेल. पण ही रेल्वे जरा खास आहे. Nilgiri Mountain Railway असं या रेल्वेचं नाव. तामिळनाडूमध्ये धावणाऱ्या या रेल्वेचा मार्ग म्हणजे सुख! 

3/7

वेगळ्याच विश्वात प्रवेश

या रेल्वेमार्गावरून प्रवास करताना तुम्ही एका वेगळ्याच विश्वात प्रवेश करता. कारण, इथं प्रत्येक वळणावर तुम्हाला निसर्गाचं वेगळं रुप पाहायला मिळतं. 

4/7

सुखावह दृश्य

जवळपास 250 लहानमोठे पूल, 16 बोगदे, 208 तीव्र वळणं असा प्रवास करत ही रेल्वे तुम्हाला पश्चिम घाटमाथ्यांचं सुखावह दृश्य दाखवते. बरं, रेल्वेचा वेग कमी असल्यामुळं तुमच्याकडे हे सौंदर्य न्यायाहळण्यााठी जास्त वेळही असतो. 

5/7

तब्बल पाच तासांचा वेळ

अवघ्या 46 किमी अंतरासाठी ही रेल्वे प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल पाच तासांचा वेळ घेते. निलगिरीच्या पायथ्याशी असणाऱ्या Mettupalayam या गावातून ही रेल्वे निघते आणि हा प्रवास Udhagamandalam अर्थात उटी या गिरीस्थानापाशी जाऊन थांबतो. 

6/7

एका वेगळ्याच काळात

इतक्या कमी अंतरासाठी इतका जास्त वेळ लागत असला तरीही या रेल्वेनं प्रवास करत असताना आपण जणू एका वेगळ्याच काळात जातो. अगदी 100 वर्षे मागे जातो असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. 

7/7

निसर्गाच्या कुशीत

कुटुंबीय, मित्र, जोडीदारासोबत निसर्गाच्या कुशीत दडलेल्या या मार्गानं प्रवास करताना रेल्वेतून निघताना तुमच्यासोबत असंख्य आठवणी असतील हे नक्की. मग, कधी जाताय या प्रवासाला?