Puma-Nike सारख्या ब्रॅंड्सला या भारतीय कंपन्यांकडून टक्कर, स्वस्तात बूट विकून कमावतात 'इतके' कोटी

Indian Shoes Brands : शूज म्हणजेच बूट म्हटले की आज प्रत्येकाला लगेच आठवतात ते एॅडिडास, नाईकी आणि पूमासारखे मोठे ब्रॅंड. पण तुम्हाला माहितीये का आपल्या भारतात असे काही ब्रॅंड आहेत जे या मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी किंमतीत शूज विकतात आणि कोटींमध्ये कमाई करतात. चला तर पाहुयात कोण आहेत त्या कंपनींचे मालक आणि त्यांची कमाी

| May 20, 2023, 19:36 PM IST
1/7

रेड चीफ

Indian Shoes Brands

 रेड चीफच्या मालकांचे नाल मनोज ग्यानचंदानी असे आहे. त्यांनी 1995 मध्ये युरोपमध्ये लेदर शूज निर्यात करण्यासाठी लियान ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड सुरू केली. त्यानंतर 1997 मध्ये, त्यांनी लियान ग्लोबल अंतर्गत रेड चीफ ब्रँड लॉन्च केला.  

2/7

कानपूरमधअये पहिले रेट चीफ आउटलेट

Indian Shoes Brands

2011 मध्ये, शू रिटेलरनं कानपूरमध्ये पहिलं रेड चीफ आउटलेट सुरु केलं. आज रेड चीफची यूपीसोबतच भारताच्या 16 राज्यांमध्ये 175 स्टोअर्स आहेत. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजमध्ये केलेल्या फाइलिंगनुसार, 2021 मध्ये कंपनीचा वार्षिक टर्न ओव्हर हा 324 कोटींहून अधिक असल्याचे म्हटले जाते. 

3/7

वूडलँड

Indian Shoes Brands

वुडलँड या शूजच्या कंपनीची स्थापना ही कॅनडात झाली असून त्याचे संस्थापक हे जरी क्यूबेक होते. कॅनडात असलेल्या या कंपनीचं मूळ हे भारतात आहे. कारण 1980 मध्ये अवतार सिंग यांनी  वुडलँडची मूळ कंपनी एरो ग्रुपची स्थापना केली. 

4/7

भारतात कुठे होते उत्पादन

Indian Shoes Brands

वुडलँडचे मुख्य प्रोडक्शन हाऊन हे दिल्लीतील नोएडामध्येच आहे. वुडलँडचे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 8 कारखाने आहेत, जे 70 टक्के मागणी पूर्ण करतात. वुडलँड दरवर्षी 1 हजार 250 कोटी रुपयांचा व्यवसाय करते.

5/7

लखानी

Indian Shoes Brands

लखानी या कंपनीची सुरुवात 1966 साली परमेश्वर दयाल लखानी यांनी केली होती. परमेश्व लखानी यांच्यानंतर त्यांचा  कुटुंबातील दुसऱ्या पिढीतील उद्योजक मयंक लखानी यांनी हा प्रवास पुढे सुरु ठेवला. 

6/7

लखानी कंपनी दरवर्षी करते इतक्या कोटींची कमाई

Indian Shoes Brands

लखानी कंपनी दरवर्षी 150 ते 200 कोटींचा व्यवसाय करते.

7/7

या कंपन्या करत आहेत वर्चस्व

Indian Shoes Brands

गेल्या बऱ्याच काळापासून याच कंपन्या कोट्यावधींची कमाई करत आहेत. त्यांनी भारतीय मार्केटमध्ये स्वत: ची जागा मिळवण्यासाठी खूप मेहनत केली आहे. (All Photo Credit : Social Medai) (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)