3 लाखांची जबरदस्त बाईक भारतात लाँच; विकत घेतली तरी रस्त्यावर चालवण्याची परवानगी नाही

स्पोर्टी लुक असलेल्या बाईक खास रेसिंगसाठी आहेत. भारतातील हौशी मंडळींनी या बाईक खरेदी केल्या तरी त्यांना रस्त्यावर चालवता येणार नाही.

Jul 16, 2023, 23:24 PM IST

Kawasaki KX65, KX112 : जपानच्या Kawasaki कंपनीने आपल्या दोन जबरदस्त स्पोर्ट्स बाईक भारतात लाँच केल्या आहेत.  KX65 आणि KX112 अशी भारतात लाँच झालेल्या या बाइक आहेत. या बाईकची स्टारटिंग प्राईज 3.12 लाख आहे. या बाईक वजनाला हलक्या आहेत. यांचे वजन 60 किलो आहे. 

1/9

जपानी दुचाकी ब्रँडने Kawasaki KX65 आणि Kawasaki KX112 लाँच केल्या आहे.   

2/9

 या बाईकमध्ये 14 इंच फ्रंट व्हील आणि 12 इंच मागील चाक आहेत. यात टेलिस्कोपिक फोर्क आणि मोनो-शॉक रिअर सस्पेंशन मिळेल.  

3/9

या बाईकमध्ये  6 स्पीड गिअरबॉक्स आहे. 

4/9

या बाईकमध्ये 64 सीसी, लिक्विड कूल, टू स्ट्रोक, सिंगल सिलेंडर कार्ब्युरेटेड इंजिन देण्यात आले आहे. 

5/9

या बाईकचे वजन फक्त 60 किलो  इतके  आहे. 

6/9

Kawasaki KX65 ही कंपनीची सर्वात छोटी बाईक मानली जात आहे. 

7/9

Kawasaki KX112 ची एक्स-शोरूम किंमत 4.87 लाख रुपयांपासून सुरू होते. 

8/9

Kawasaki KX65 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत रु. 3.12 लाख आहे. 

9/9

सार्वजनिक रस्त्यावर KX112 आणि KX65 चालवणे बेकायदेशीर आहे. हेडलाइट्स किंवा टेल लाइट्स आणि इंडिकेटर नाहीत.