जिओचा पैसा वसूल प्लॅन; 388 दिवसांचा रिचार्ज एकदाच करा अन् मिळवा भन्नाट ऑफर

Jun 02, 2023, 19:21 PM IST
1/6

jio plan

Jio च्या 2999 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये तुम्हाला या सुविधा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये काय उपलब्ध आहे आणि एअरटेलच्या 2999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनपेक्षा तो किती चांगले आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया.

2/6

Jio prepaid plan

जिओचा 2999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. पण या प्लॅनमध्ये 23 दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी मिळते आहे. त्यामुळे एकूण 388 दिवसांचा हा प्लॅन होतो. 

3/6

jio recharge data

या प्लॅनमधील दैनंदिन खर्च 7 रुपये इतका असणार आहे. या व्यतिरिक्त, प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा उपलब्ध आहे. पण कंपनी आपल्या युजर्सना 75GB अतिरिक्त डेटा देखील देत आहे.

4/6

jio plan data

त्यामुळे संपूर्ण प्लॅन दरम्यान, युजर्सला 987.5 GB (912.5 GB + 75GB) 4G डेटा मिळणार आहे. एवढेच नाही तर संपूर्ण प्लॅनदरम्यान अनलिमिटेड कॉल आणि दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध असणार आहे.

5/6

Jio TV

या प्लॅनच्या अतिरिक्त फायद्यांमध्ये तुम्हाला Jio TV, Jio Cinema सारख्या Jio अॅप्समध्ये प्रवेश देखील मिळणार आहे. चांगली गोष्ट म्हणजे कंपनी पात्र असलेल्या ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा देखील देत आहे.

6/6

airtel recharge

दुसरीकडे एअरटेलचा 2999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 365 दिवसांच्या व्हॅलिडीसह दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएसची ऑफर देतो. या प्लॅनमध्ये  Apollo 24/7 सर्कल सबस्क्रिप्शन, मोफत Hellotunes आणि 3 महिन्यांसाठी मोफत Wynk Music सबस्क्रिप्शन यांचा देखील समावेश आहे.