'कुछ कुछ होता है' सिनेमाला २० वर्ष पूर्ण | या सिनेमा मागची ८ गुपितं

कुछ कुछ होता है...या नव्वदच्या दशकात आलेला सिनेमा खूप लोकप्रिय झाला होता, कुछ कुछ होता है सिनेमाला आज २० वर्ष पूर्ण झाली.

Oct 16, 2018, 23:54 PM IST

कुछ कुछ होता है...या नव्वदच्या दशकात आलेला सिनेमा खूप लोकप्रिय झाला होता, कुछ कुछ होता है सिनेमाला आज २० वर्ष पूर्ण झाली.

हा सिनेमा १९९८ साली प्रदर्शित झाला. हा सिनेमा प्रचंड़ हिट झाला, हे एक मोठं यश होतं. ही एक प्रेम कहाणी आहे, शाहरूख आणि काजोलच्या अभिनयाने या सिनेमात रंग भरलेले आहेत. मैत्री आणि प्रेमाचं हे एक कॉम्बिनेशन सर्वांना भावलं, यात 'प्यार दोस्ती है' ही प्रेमाची कल्पना खूपच हीट झाली.

या सिनेमाचं कथानक करन जोहरने लिहिलं आणि दिग्दर्शित केलं. या सिनेमात पडद्यावर राणी मुखर्जी (सिनेमातील टीना), शाहरूख खान (सिनेमातील राहुल) आणि काजोल (सिनेमातील अंजली) यांचं एक अनोखं आणि सर्वांना भावणारं त्रिकुट एकत्र होतं. या सिनेमात काम करणाऱ्या सर्वांसाठीच ही भूमिका त्यांचं करिअर एक नव्या उंचीवर नेणारं ठरलं.

हा तीन जणांच्या प्रेमाच्या त्रिकोणात सर्व काही रोमान्स, प्रेम, दु:ख आणि प्रेमाची भावना, त्या वेळी युवक आणि युवतींना हा सिनेमा डोक्यावर घेतला होता, शाहरूख आणि काजोलसोबत राणी मुखर्जीची लोकप्रियता येथूनच मोठ्या प्रमाणात वाढत गेली.

1/10

2/10

सिनेमाला १६ ऑक्टोबर रोजी २० वर्ष पूर्ण

 kuch kuch hota hai completed 20 years_kajol_srk

कुछ कुछ होता है, सिनेमाला १६ ऑक्टोबर रोजी २० वर्ष पूर्ण झाली आहेत, त्या निमित्ताने आम्हाला वाटतंय की तुम्हाला, या सिनेमाच्या पडद्यामागील रंजक गोष्टी सांगाव्यात.

3/10

राहुल आणि अंजलीसाठी करण जोहर यांची पसंती होती

 kuch kuch hota hai completed 20 years_ddlj

शाहरूख आणि काजोल ही जोडीच राहुल आणि अंजलीसाठी करण जोहर यांची पसंती होती, आणि आम्ही आगामी कुछ कुछ होता है सिनेमात काम करणार असं त्यांनी आधीच, 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'पासून सांगून ठेवलं होतं.

4/10

टि्वंकल खन्ना होती पहिली चॉईस पण

 kuch kuch hota hai completed 20 years_twinkle

टीना हे पात्र जे राणी मुखर्जीने साकारलं ते ट्विंकल खन्नाला डोळ्यासमोर ठेवून लिहिण्यात आलं होतं, पण ट्विंकल खन्नाने ती भूमिका नाकारली.

5/10

राणी मुखर्जीचं वय होतं तसं फारच कमी

 kuch kuch hota hai completed 20 years_rani

या सिनेमाचं शुटिंग सुरू होतं तेव्हा राणी मुखर्जी १९ वर्षांची होती.

6/10

काजोल आणि सलमानमध्ये अबोला मात्र...कॅमेऱ्यासमोर

 kuch kuch hota hai completed 20 years_kaljol_salman

'साजन जी घर आए' या सिनेमाचं शुटिंग झालं त्या दरम्यान अनेक दिवस सलमान खान आणि काजोल एकमेकांशी बोलत नव्हते, पण कॅमेऱ्यासमोर ते तसा अभिनय करत होते.

7/10

बाल कलाकार आता कशी दिसते पाहा

 kuch kuch hota hai completed 20 years_crying

राणी मुखर्जीच्या मुलीची भूमिका साकारणारी बाल कलाकार सैय्यद सईद ग्लिसरीन लावायला तयार नव्हती, पण भूमिकेसाठी ते किती महत्वाचं आहे, हे करण जोहरने नंतर तिला समजावलं.

8/10

पोलोच्या टीशर्ट मागचा किस्सा

 kuch kuch hota hai completed 20 years_polo_tshirt

शाहरूख खानने या सिनेमात घातलेलं पोलोचं टीशर्ट शुटिंगच्या ३ तास आधी मनीष मल्होत्राने सिलेक्ट केलं होतं, ते ७, २५५ रूपयांचं होतं. यावर मनीष मल्होत्रा आणि करन जोहरची चांगलीच जुंपली होती, ते शाहरूखला घालावसं वाटत नव्हतं कारण ते त्याला घट्ट होतं होतं.

9/10

काजोल या दृश्यात खरोखर रडली होती का

 kuch kuch hota hai completed 20 years_poster_salman_kajol_crying

सिनेमाचा क्लायमेक्स जेव्हा येतो आणि राहुल-अंजलीला अमन एकत्र येण्यास सांगतो, तेव्हा काजोलला खरोखर रडू आलं होतं.

10/10

सलमानने साकारलेला अमनचा रोल आधी कुणाला ऑफर झाला होता...

 kuch kuch hota hai completed 20 years_poster_salman

सलमान खानने साकारलेला अमनचा रोल, याआधी सैफ अली खानला ऑफर करण्यात आला होता, पण तो त्याने नाकारला होता.