ना धोनी, ना रोहित; बॅटसाठी 'या' खेळाडूला मिळते तब्बल 100 कोटींची स्पॉन्सरशिप

Cricket News : फक्त क्रिकेटप्रेमी आणि निवड समितीच नव्हे, तर विविध वितरक, स्पॉन्सर्स आणि बरीच मंडळी या खेळाडूंवर नजर ठेवून असतात. यातूनच पुढे या खेळाडूंना विविध स्तरांर स्पॉन्सरशिप मिळू लागते.   

Jul 19, 2023, 08:49 AM IST

Cricket News : एखादा क्रिकेटपटू आणि त्याहूनही एखादा फलंदाज जेव्हा अफलातून फलंदाजी करत विरोधी संघातील गोलंदाजांचा धुव्वा उडवतो, तेव्हा त्याच्यावर अनेकांच्याच नजरा खिळतात. 

1/7

तुम्हाला माहितीये का...

Most Expensive Bat Sponsorship In The World Worth Over 100 Crore guess the cricketer

तुम्हाला माहितीये का, भारतीय क्रीडाजगतातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या फलंदाजीच्या बळावर त्यानं एमआरएफकडून वर्षाला तब्बल 8 कोटी रुपयांची वार्षिक स्पॉन्सरशिप मिळाली होती. 

2/7

विराट कोहली

Most Expensive Bat Sponsorship In The World Worth Over 100 Crore guess the cricketer

फलंदाजीसाठी थोडक्यात बॅटसाठी मिळणाऱ्या स्पॉन्सरशिपमध्ये विराट कोहलीनं सर्वांनाच पिछाडीवर टाकलं आहे. कारण, त्याला 2025 पर्यंत एमआरएफकडून तब्बल 100 कोटी रुपयांची स्पॉन्सरशिप मिळाली आहे. एका वर्षामध्ये विभागायचं झाल्यास 12.5 कोटी इतक्या रकमेची स्पॉन्सरशिप त्याला मिळते.   

3/7

रोहित शर्मा

Most Expensive Bat Sponsorship In The World Worth Over 100 Crore guess the cricketer

रोहित शर्मा एका वर्षाला 4 कोटी रुपयांची स्पॉन्सरशिप मिळते. त्याच्या बॅटसाठी CEAT कडून ही स्पॉन्सरशिप मिळते.   

4/7

बाबर आझम

Most Expensive Bat Sponsorship In The World Worth Over 100 Crore guess the cricketer

पाकिस्तानच्या कर्णधारपदी असणाऱ्या बाबर आझम याला Gray-Nichols कडून बॅटसाठी एका वर्षाला 1.14 रुपयांची स्पॉन्सरशिप मिळते. 

5/7

महेंद्रसिंह धोनी

Most Expensive Bat Sponsorship In The World Worth Over 100 Crore guess the cricketer

महेंद्रसिंह धोनीही त्याच्या फलंदाजीमुळं कायमच चर्चेत राहिला असून, त्याला एका वर्षात तबब्ल 2.2 कोटी रुपयांची स्पॉन्सरशिप मिळत होती. आता मात्र माहीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, आता तो फक्त IPL मध्येच खेळतो. 

6/7

ऋषभ पंत

Most Expensive Bat Sponsorship In The World Worth Over 100 Crore guess the cricketer

मागील वर्षी भीषण कार अपघातामुळं दुखापतग्रस्त झालेल्या आणि आता या अपघातातून सावरणाऱ्या ऋषभ पंत याला SG कंपनीकडून बॅटसाठी एका वर्षाला 2 कोटी रुपयांची स्पॉन्सरशिप मिळते. 

7/7

जो रुट

Most Expensive Bat Sponsorship In The World Worth Over 100 Crore guess the cricketer

तर, इंग्लंडचा कर्णधार जो रुट याला बॅटसाठी 1.8 कोटी रुपयांची स्पॉन्सरशिप मिळते.