नोटबंदीची घोषणा; तुमच्या घरी दोन हजारच्या नोटा असतील तर आधी हे काम करा
सात वर्षांपूर्वी मोदी सरकारने नोटबंदी केली होती. 8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानुसार चलनात असलेल्या 500 आणि 1 हजारच्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा दोन हजारच्या नोटा बंद करण्यात आल्या आहेत.
2000 Rupees Note: दोन हजार रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं तसा निर्णय जाहीर केला आहे. 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश RBI अर्थात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दिले आहेत.