अशी होती सुषमा स्वराज यांची थक्क करण्याची कारकिर्द

 सुषमा स्वराज यांनी नेते, कार्यकर्ते, सामान्य जनता यांच्या मनात घर केले होते. 

Aug 07, 2019, 13:16 PM IST

मुंबई : हरियाणाच्या अंबालामधूर आपल्या राजकारणात पदार्पण करणाऱ्या भाजपाच्या जेष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि मध्यप्रदेशमधील विदिशाच्या खासदार राहिलेल्या सुषमा स्वराज यांचा प्रवास अखेर संपला. त्यांच्या निधनाने फक्त नेतेमंडळी नाही तर कलाविश्व त्याचप्रमाणे भारतीय जनतेला सुद्धा मोठा धक्का बसला आहे. सुषमा स्वराज यांनी नेते, कार्यकर्ते, सामान्य जनता यांच्या मनात घर केले होते. फार कमी वयात मंत्री होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला होता. त्याचप्रमाणे त्या दिल्लीतल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री राहिल्या होत्या. 

1/6

आणीबाणीच्या काळात राजकारण सुरू केले

आणीबाणीच्या काळात राजकारण सुरू केले

सुषमा स्वराज यांनी आणीबाणीच्या काळात आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. भारत देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या द्वारे १९७५ ते १९७७ पर्यंत आणिबाणीची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांतच सुषमा स्वराज यांनी भारताच्या राजकारणात प्रवेश केला. १९७७ साली त्या हरियाणाच्या आमदारपदी विराजमान झाल्या. 

2/6

सर्वात कमी वयातील मंत्री

सर्वात कमी वयातील मंत्री

१९७७ साली वयाच्या २५ व्या वर्षी सुषमा स्वराज या कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या. सर्वात कमी वयाच्या त्या कॅबिनेट मंत्री ठरल्या होत्या. हरियाणाच्या आमदार पदावर त्यांची नियुक्ती झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री चौधरी देवी लाल यांनी सुषमा स्वराज यांच्यावर कामगार मंत्रालयाचा कार्यभार सोपवला. 

3/6

सर्वात तरुण वयात प्रदेशाध्यक्ष झाल्या

सर्वात तरुण वयात प्रदेशाध्यक्ष झाल्या

हरियाणाच्या राजकारणात सक्रीय झाल्यानंतर सुषमा स्वराज यांना भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष म्हाणून नियुक्त करण्यात आले.   

4/6

१९९० मध्ये संसदेत पोहोचल्या

१९९० मध्ये संसदेत पोहोचल्या

हरियाणाच्या राजकारणार उत्तमरित्या सक्रीय झाल्यानंतर त्यांनी केंद्रीय राजकारणात आपले पाऊल ठेवले. १९९० मध्ये निवडणुकीत बाजी मारत सुषमा स्वराज खासदार झाल्या आणि पहिल्यांदा संसदेत पोहोचल्या.

5/6

सोनिया गांधींच्या विरोधात उतरल्या रिंगणात

सोनिया गांधींच्या विरोधात उतरल्या रिंगणात

भाजपा पक्षाच्या तिकीटावर त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विरोधात रिंगणात उतरल्या. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधींविरूद्ध बेल्लारीची निवडणूक लढविली. परंतु त्यांना पराभव पत्कारावा लागला. पराभवानंतरही त्यांचा आत्मविश्वास कमी झाला नाही. 

6/6

परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार

परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार

पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या पहिल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार चोख रित्या सांभाळला. परराष्ट्र मंत्री पदावरील त्यांचे योगदान फार मोलाचं होतं. त्या आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी परराष्ट्र मंत्री मानलं जातं.