अंबालातील दुकानात पूरी-भाजी खाण्यासाठी यायच्या सुषमा

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक जण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अंबालामध्ये त्यांच्या घराजवळ असणाऱ्या कालका पूरीवाले यांनीही काही आठवणी सांगितल्या आहेत.

Aug 07, 2019, 15:57 PM IST
1/5

कालका पूरीवाले यांचं अंबालामध्ये १९५७ पासून दुकान आहे. त्यावेळी सुषमा जवळपास ५ वर्षांच्या असतील. तेव्हापासून कालका पूरीवाले पूरी विकण्याचं काम करतात. त्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत कालका पूरीवाले यांनी, लहानपणापासून सुषमा यांना या दुकानातील पूरी अतिशय आवडायची. त्या नेहमी इथे पूरी खाण्यासाठी येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

2/5

केवळ अंबालाच नाही तर, त्यांचं या भागात जवळपास कुठेही येणं झालं तर त्यांना इथूनच जेवण जात असल्याचं दुकानाच्या मालकांनी सांगितलं. 

3/5

परराष्ट्र मंत्री बनल्यानंतर एकदा मुलाखत देताना सुषमा स्वराज यांनी या गोष्टीचा उल्लेखही केला होता की, त्या जेव्हा कधी अंबाला जातात, तेव्हा पूरी अगदी आवर्जुन खातात.

4/5

पूरी-भाजीच्या दुकानाच्या मालकांनी, सुषमा अंबाला किंवा पंजाबच्या कोणत्याही भागात कामासाठी आल्या तर त्यावेळी त्यांच्यासाठी जेवणाचा खास डब्बा याच दुकानातून पोहचत असल्याचं सांगितलं.

5/5

या शहरातील तीन पिढ्याची सुषमाजींसोबत नाती आहेत. त्या कोणासाठी बहीण होत्या, कोणासाठी मुलगी तर तिसऱ्या पिढीसाठी त्या आत्या होत्या. सुषमा यांनाही अंबालातील लोकांसाठी एक वेगळंच प्रेम असल्याचं दुकानाच्या मालकांनी सांगितलं.