दोन हजार रुपये द्या पाकिस्तानी क्रिकेटर्सना भेटा, पीसीबीच्या स्किमवर दिग्गज खेळाडू संतापला

T20 World Cup 2024 Pakistan Team : टी20 वर्ल्ड कपसाठी बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघ अमेरिकेत दाखल झाला आहे. पाकिस्तानचा पहिला सामना 6 जूनला यजमान अमेरिकेविरुद्ध खेळला जाणार आहे. 

| Jun 05, 2024, 21:45 PM IST
1/7

पाकिस्तान क्रिकेट संघ या ना त्या कारणाने चर्चेत असते. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या टी20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी अमेरिकेत आहे. 6 जुनला डलासमध्ये पाकिस्तानचा पहिला सामना यजमान अमेरिकेशी रंगणार आहे. 

2/7

पण पहिल्या सामन्याआधीच पाकिस्तानचा क्रिकेट संघ नव्या वादात अडकला आहे. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तानच्याच माजी खेळाडूंकडून संताप व्यक्त केला जात आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका निर्णयावर सध्या जोरदार टीका केली जात आहे. 

3/7

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानी खेळाडूंसाठी एका डिनर पार्टीचं आयोजन केलं हतं. या डिनर पार्टित चाहत्यांना खेळाडूंची संधी देण्यात आली होती. पण यासाठी एक अट होती. पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंना भेटण्यासाठी चाहत्यांना पैसे द्यावे लागणार होते. यासाठी 25 डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 2085 इतकी किंमत ठेवण्यात आली होती.

4/7

25 डॉलर म्हणजे पाकिस्तानात  6,960 रुपये होतात. आपल्या आवड्या क्रिकेटपटूला भेटण्यासाठी चाहत्यांनी इतके पैसे पीसीबीकडे जमा करावे लागणार होते. पण पीसीबीच्या या स्किमवर आता पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी आणि माजी खेळाडूंनी जोरदार टीका केली आहे. 

5/7

पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने यावर संताप व्यक्त केला आहे. पीसीबीचा हा निर्णय भयानक आहे. अवघ्या 25 डॉलरसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानी खेळाडूंना विकल्याचं लतीफने म्हटलंय. पाकिस्तानी खेळाडूंना कोणत्या कार्यक्रमासाठी बोलवायच्या आधी किती पैसे घेणार असं विचार जातं, असंही लतीफने म्हटलंय.

6/7

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ही स्किम खेळाडूंना बरबाद करणारी आणि पाकिस्तान क्रिकेटला लाज आणणारी असल्याची टीकाही लतीफने केलीय. अवघ्या 2 हजार रुपयांसाठी खेळाडूंनीही आपला स्वाभिमान गहाण ठेवल्याचंही त्याने म्हटलंय. 

7/7

एखाद्या चॅरेटीसाठी हा डिनर कार्यक्रम असेल तर आपण समजू शकतो.पण हा खासगी कार्यक्रम होता. खेळाडूंनी अशा कार्यक्रमाला विरोध करायला हवा आहे, असा सल्लाही लतिफने दिलाय.