देशभरात असा साजरा झाला प्रजासत्ताक दिन.....

 

Jan 26, 2019, 13:47 PM IST

 

 

 

1/12

देशभरात असा साजरा झाला प्रजासत्ताक दिन

७० वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्सहाने साजरा केला जात आहे. राजपथावर देशभक्तांची अलोट गर्दी होती. राजपथ त्याचप्रमाणे देशात अनेक भागात प्रजासत्ताक दिन साजरा झाला. शाळा, महाविद्यालयांमध्ये तिरंग्याला वंदन करण्यात आले. राजपथावर प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा उपस्थिती होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थिती होते. राजपथावर आणि देशातील अन्य ठिकाणी साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाची काही दृश्यं...

2/12

देशभरात असा साजरा झाला प्रजासत्ताक दिन

राजपथ येथे बीएसएफच्या कॅमल माउंटेड बँड यांनी 'हम है सीमा सुरक्षा बाल' घोषणा देत तिरंग्याला वंदन केले(छाया सौजन्य-एएनआय)

3/12

देशभरात असा साजरा झाला प्रजासत्ताक दिन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजपथावर डॉ. मनमोहन सिंग यांचे स्वागत केले.(छाया सौजन्य-एएनआय)

4/12

देशभरात असा साजरा झाला प्रजासत्ताक दिन

अमर जवान ज्योती येथे तिरंग्याला मानवंदना देताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.(छाया सौजन्य-एएनआय)

5/12

देशभरात असा साजरा झाला प्रजासत्ताक दिन

राजपथ येथे लोकांची अलोट गर्दी, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती (छाया सौजन्य-एएनआय)

6/12

देशभरात असा साजरा झाला प्रजासत्ताक दिन

काश्मीरमधील चकमकीत ६ दहशवाद्यांचा खात्मा करणाऱ्या लान्स नायक नाझिर अहमद वानी यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांना प्रजासत्ताकदिनी आशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपतिंच्या हस्ते वानी यांच्या पत्नी आणि आई यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.(छाया सौजन्य-एएनआय)  

7/12

देशभरात असा साजरा झाला प्रजासत्ताक दिन

दिल्ली पक्ष कार्यालयाबाहेर तिरंगा फडकवताना भाजपचे अध्यक्ष अमित शाह (छाया सौजन्य-एएनआय)  

8/12

देशभरात असा साजरा झाला प्रजासत्ताक दिन

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ लखनऊ येथे तिरंग्याला मानवंदना करताना.(छाया सौजन्य-एएनआय)

9/12

देशभरात असा साजरा झाला प्रजासत्ताक दिन

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण करताना.(छाया सौजन्य-एएनआय)

10/12

देशभरात असा साजरा झाला प्रजासत्ताक दिन

प्रयागराज येथे कुंभमेळ्यात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह.(छाया सौजन्य-एएनआय)

11/12

देशभरात असा साजरा झाला प्रजासत्ताक दिन

लखनऊ येथील दारुल उलूम फिरंगी महल मदरसा येथे प्रजासत्ताक दिन साजरा.(छाया सौजन्य-एएनआय)

12/12

देशभरात असा साजरा झाला प्रजासत्ताक दिन

७० व्या प्रजासत्ताक दिनी पश्चिम बंगालमधील सिलीगुरीजवळील इंडो-बांग्लादेश सीमेवर फुल्बारी येथे बंग्लादेशीय जवानांसोबत मिठाईची देवाण-घेवाण करताना भारतीय जवान. (छाया सौजन्य-एएनआय)