Weekly Love Horoscope : ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे 'या' राशींचे आयुष्य असेल रोमँटिक

Weekly Love Horoscope 8 to 14 May 2023 : मे महिन्यातील दुसऱ्या आठवडाला सुरुवात झाली आहे. या आठवड्यात 9 ग्रहांपैकी मंगळ आणि मेष हे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. ग्रह गोचर आणि नक्षत्रांचा आपल्या राशींवर परिणाम होतो. या आठवड्यात तुमचं लव्ह लाइफ कसं असेल जाणून घ्या. 

May 07, 2023, 16:09 PM IST

Weekly Love Horoscope 8 to 14 May 2023 : प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा खूप खास असणार आहे. मंगळ, बुध यांचं गोचर होणार आहे. याठिकाणी सूर्य, राहू आणि गुरु आधीपासून असल्याने ग्रहांचं हे संक्रमण शुभ ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी हा आठवडा प्रेमासंबंधी कसा राहणार आहे. (Saptahik Rashifal)

1/13

Weekly Love Horoscope

हा आठवडा ग्रह गोचरसाठी महत्त्वाचा आहे. मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार आहे तर बुध मेष राशीत संक्रमण करणार आहे. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे 'या' राशींचे आयुष्य रोमँटिक असणार आहे. (weekly love horoscope 8 to 14 may 2023 love prediction all zodiac signs romantic astro news in marathi ) 

2/13

मेष (Aries)

या राशीचं लव्ह लाइफ आनंदी असणार आहे. जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालविणार आहात. बाहेर जाण्याचा बेत आखण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी प्रेमसंबंधी काहीतरी महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

3/13

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांचं लव्ह लाइफ रोमँटिक असणार आहे. परस्परामधील संबंध घट्ट करणारा हा आठवडा ठरणार आहे. प्रेमजीवनाबद्दल  महत्त्वाचा निर्णय घेणार आहात. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे.   

4/13

मिथुन (Gemini)

या लोकांच्या लव्ह लाइफमध्ये अडचणी वाढणार आहेत. नात्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता आहे. 

5/13

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांना प्रेमसंबंधात अधिक मेहनत करावी लागणार आहे. समजूतदारपणा दाखविल्यास नातं मजबूत होऊ शकतं. वैवाहिक जीवनात आनंदाची बातमी मिळणार आहे. विवाहाचे योग आहेत.

6/13

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांना प्रेम जीवनात आनंदी क्षणाचा अनुभव येणार आहे. जोडीदारासोबत जास्तजास्त वेळ व्यतित करा. त्यामुळे नात्यामध्ये प्रेम दृढ होईल. वैवाहिक जीवनासंबंधीत निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. 

7/13

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांचे प्रेम जीवन आनंददायी राहणार आहे. पण नात्यामध्ये मतभेद होऊ शकतात. संवादातून हा प्रश्न सुटू शकणार आहे. त्यामुळे जोडीदारासोबत बोला आणि नातं अधिक मजबूत करा. आठवड्याचा शेवटी लव्ह लाइफ प्रेमाने भरलेला असणार आहे. 

8/13

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांचं प्रेम जीवना जरा कठीण असणार आहे. त्यांना महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची वेळ येणार आहे. विचारपूर्व आणि प्रॅक्टिकल राहून काहीही निर्णय घ्या अन्यथा वाद वाढतील. आठवड्याचा शेवटी आयुष्यात प्रेमच प्रेम असणार आहे. 

9/13

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांचे लव्ह लाइफ मस्त असणार आहे. प्रेमाबद्दल एखादा चांगला निर्णय घेणार आहात.  घरात आनंदाचं वातावरण असणार आहे. मात्र नात्यामध्ये दुसऱ्याला हस्तक्षेप करु देऊ नका. 

10/13

धनु (Sagittarius)

या राशीचे लव्ह लाइफ आनंदाने भरलेलं असणार आहे. जोडीदाराला वेळ दिल्यामुळे परस्परातील प्रेम वाढणार आहे. आयुष्याचा नव्या टप्प्याचा विचार करणार आहात. काही निर्णय घेण्याची वेळही तुमच्यावर येणार आहे. घरच्यांशी लग्नासंबंधी बोलण्याची ही योग वेळ आहे. 

11/13

मकर (Capricorn)

या लोकांना प्रेम जीवनात चढ उतार पाहावे लागणार आहे. जोडीदाराकडे लक्ष द्या आणि वेळ द्या. एकमेकांना प्रेम, आदर आणि संवाद साधा. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होणार आहे. 

12/13

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांचे प्रेम जीवन प्रेमाने भरलेलं असणार आहे. प्रत्येक क्षणाला आनंदाचे क्षण अनुभवणार आहे. रोमान्स आणि रोमँटिक असा हा आठवडा ठरणार आहे.   

13/13

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांच्या लव्ह लाइफमध्ये प्रेमच प्रेम असणार आहे. तुम्ही सुंदर भविष्यातचे स्वप्न रंगवणार आहात. घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. विवाह योग असल्याने घरातील वरिष्ठ्यांशी आपल्या नात्याबद्दल सांगू शकता.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)