भोंदू बाबांनो खबरदार, जादूटोणाविरोधी कायदा लागू झालाय!
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर राज्यसरकारनं वटहुकूमाद्वारे राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू झालाय. वटहुकूमावर राज्यपालांनी आज स्वाक्षरी केलीय.
Aug 24, 2013, 08:34 PM ISTदाभोलकरांच्या हत्याप्रकरणी धागेदोरे, पोलिसांचा दावा
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची गोळी मारून हत्या करणाऱ्यांच्या मोटरसाईकलचा तपास लागला आहे, असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.
Aug 23, 2013, 11:04 AM ISTनरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचे पडसाद संसदेत
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचे पडसाद आज संसदेत उमटले. या हत्येचा राज्यसभेनं एकमुखानं निषेध केला. काँग्रेसचे हुसेन दलवाई यांनी सनातन, हिंदू जनजागृती समिती यासारख्या कडव्या संस्थांवर बंदी घालण्याची मागणी केली. राज्य सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावर केंद्रानं तातडीनं विचार करावा, अशी मागणी दलवाई यांनी केली.
Aug 22, 2013, 01:58 PM ISTदाभोलकरांच्या हत्येशी संबंध नाही- सनातन संस्था
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी `सनातन`चा काहीही संबंध नसल्याचा खुलासा संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केलाय. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा खुलासा केला. शिवाय सनातन संस्थेनं कालच जाहीर पत्रक काढून डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येचा निषेधही व्यक्त केला होता.
Aug 21, 2013, 04:34 PM ISTमृत्यूनंतरही डॉ. दाभोलकरांवर सनातनची आखपाखड
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूनंतरही सनातन प्रभातकडून त्यांची अवहेलना सुरुच आहे. दाभोलकरांचा झालेला मृत्यू ही ईश्वरी कृपाच असल्याची आगपाखड सनातनच्या मुखपत्रातून करण्यात आलीय.
Aug 21, 2013, 02:18 PM ISTडॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुणे बंद
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात पुरोगामी संस्था-संघटना आणि सर्वपक्षांच्यावतीनं बंद पुकारण्यात आलाय.
Aug 21, 2013, 09:40 AM ISTडॉ. दाभोलकरांच्या फोटोंवरील ‘क्रॉस’चं गूढ काय?
डॉ. नरेंद्र दाभोलकरांना धमक्यांचे फोन येत असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केलं. शिवाय मुख्यमंत्र्यांनीही ही हत्या म्हणजे पूर्वनियोजिक कट असल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमिवर आता दाभोलकरांच्या फोटोंवर असलेलं ‘क्रॉस’चं चिन्हं काय सांगतं, हा प्रश्न निर्माण झालाय?
Aug 20, 2013, 01:24 PM ISTदाभोलकरांची हत्या, पूर्वनियोजित कट?
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना काही दिवसांपासून धमकीचे फोन येत असल्याची माहिती अंनिसचे प्रदेशाध्यक्ष अविनाश पाटील यांनी झी मीडिला दिलीय. त्यामुळं हा पूर्वनियोजित कट असल्याचं बोललं जातंय.
Aug 20, 2013, 12:46 PM IST