महापौर

भाजपसोबत झालेल्या तडजोडीमुळे कट्टर शिवसैनिक नाराज

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा महापौर झाला असला तरी भाजपसोबत झालेल्या तडजोडीमुळं शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे... ठाण्याची कमान सांभाळणाऱ्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीच ही भावना व्यक्त केलीय. 

Nov 11, 2015, 07:34 PM IST

'पक्ष देईल तो आदेश मान्य करू'

'पक्ष देईल तो आदेश मान्य करू'

Nov 11, 2015, 06:35 PM IST

केडीएमसी महापौर, उपमहापौर पदावर आज शिक्कामोर्तब

राज्याचे लक्ष असलेल्या कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज होत आहे. शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी तर भाजपच्या विक्रांत तरे किंवा विशाल पावशे यांची उपमहापौरपदी निवड होण्याचे संकेत मिळत आहेत.

Nov 11, 2015, 08:54 AM IST

राज्यातील १०० नगरपरिषद, पंचायती, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर

शासनाने नव्याने स्थापन केलेल्या १०० नगरपरिषदा,पंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव प्रवर्गाची आरक्षण सोडत मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली. यात राज्यातील अनुसूचित जाती ६ तर अनुसूचित जमाती ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग १३आणि खुल्या प्रवर्गातील २८ नगरपरिषदा महिलांसाठी राखीव आहेत.

Nov 10, 2015, 12:06 PM IST

...तर केडीएमसीत शिवसेनेशिवाय आमची सत्ता होती : मुख्यमंत्री

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपची कलगीतुरा पाहायला मिळाला. मात्र, दोघांना  बहुमताचा आकडा गाठता आला नसल्याने दोघांनी युती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भाजपकडून केडीएमसीत महापौर बसविण्याचा प्रयत्न सुरु होता. शिवसेनेशिवाय आमचा महापौर असता, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Nov 10, 2015, 11:16 AM IST

मुंबईत जमीनदोस्त केलेल्या अवैध हुक्का पार्लरचे महापौरांकडून उदघाटन

मुंबई महानगर पालिकेच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात आहेत. महापालिकेने तोडलेल्या अवैध हुक्का पार्लरचं स्नेहल आंबेकरांनीच पुन्हा उदघाटन केले आहे.

Nov 10, 2015, 09:47 AM IST

शिवसेना-भाजप युतीचा केडीएमसीतील सत्तेचा फॉर्म्युला निश्चित

आमचाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापौर बसणार असा दावा भाजपने केला होता. मात्र, त्यांना दुसऱ्या टर्ममधील एक वर्षाचे महापौरपद मिळणार आहे. तर शिवसेनेचा महापौर हा आता केडीएमसीत बसणार आहे. युतीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तबही झाले. त्यामुळे युतीचा तिढा सुटला.

Nov 7, 2015, 06:32 PM IST

कल्याणचा महापौर ११ नोव्हेंबरला निवडणार

 कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदाची निवडणूक ११ नोव्हेंबरला १२ वाजता होणार आहे. ७ तारखेपासून अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 

Nov 4, 2015, 06:15 PM IST

शिवसेनेकडून दीपेश आणि रमेश म्हात्रे अर्ज भरणार

शिवसेना उद्या कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदासाठी दावा करण्याची शक्यता आहे... शिवसेनेकडून दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे हे दोघे महापौरपदासाठी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Nov 4, 2015, 03:16 PM IST

कडोंमपा - कोल्हापुरात आमचाच महापौर बसेल - भाजप

कडोंमपा - कोल्हापुरात आमचाच महापौर बसेल - भाजप

Nov 3, 2015, 05:26 PM IST

कोल्हापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता, महापौर काँग्रेसचा

भाजपने कोल्हापुरात आपले बस्तान मांडण्यासाठी ताराराणी या स्थानिक पक्षाशी आघाडी केली. मात्र, त्यांना त्यात मोठे अपयश आले. तर काँग्रेसने आपले बस्तान चांगलेच बसविले. त्यामुळे पालिकेत त्यांच्या पक्षाचा महापौर बसणार आहे. काँग्रेसने 'हात' पुढे करत राष्ट्रवादीला सोबत घेत त्यांच्या पारड्यात उपमहापौरसह महत्वाचे स्थायी समिती सभापतीपद देण्याचे मान्य केलेय.

Nov 3, 2015, 03:55 PM IST

भाजपचाच महापौर होणार, पण कसा ते माहीत नाही - कपिल पाटील

भाजपचाच महापौर होणार, पण कसा ते माहीत नाही - कपिल पाटील 

Nov 2, 2015, 05:32 PM IST