शिर्डी

शिर्डी संस्थानच्या नावाची बनावट देणगी पावती

साईबाबा संस्थानच्या नावाची बनावट देणगी पावती तयार करणा-या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. 

Aug 10, 2014, 11:46 PM IST

गुरूर्पौणिमेला साईचरणी 4 कोटी 47 लाख

गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिर्डीच्या साईंबाबांच्या चरणी तब्बल 4 कोटी 47 लाखांचं देणगी जमा झालीय. ही देणगी सोने, चांदी आणि रोख रक्कमेच्या स्वरुपात आहे.

Jul 15, 2014, 05:51 PM IST

शंकराचार्यांच्या मताला साईबाबांच्या भक्तांची तिलांजली!

आज गुरुपौर्णिमा... शिर्डीतही गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय… गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी सजलीय. देशविदेशातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेत.

Jul 12, 2014, 09:08 AM IST

कोट्यवधींची कमाई करणाऱ्या साई संस्थानाची शिर्डी भकास

देशात सध्या सर्वाधिक कमाई करणारं साई संस्थानाचं शिर्डी शहर सध्या भकास होतंय. मुलभूत आणि पायाभूत सुविधांची वाणवा असल्यानं पर्यटक हैराण झालेत. साई संस्थान मात्र नफ्या तोट्याचं गणित जोडण्यात दंग झालंय.

Jun 25, 2014, 05:48 PM IST

साईबाबा देव नाही, शंकराचार्य स्वरुपानंदांचं वादग्रस्त वक्तव्य

शिर्डीचे साईबाबा हे काही देव नाहीत. त्यामुळं त्यांचं देऊळ बांधणं चुकीचं आहे. त्यांच्या नावावर बक्कळ पैसा कमावला जातोय, अशी वादग्रस्त टिप्पणी केलीय द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी... असं वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलंय.

Jun 23, 2014, 04:42 PM IST

योगेश घोलप बंडखोरी करणार? उमेदवारी अर्ज दाखल

शिर्डीमध्ये बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिक्षा झालेले बबनराव घोलप यांचे पूत्र योगेश घोलप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ते बंडखोरी करण्याची शक्यताय. तर शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय.

Mar 26, 2014, 03:58 PM IST

शिर्डीतून योगेश घोलपला शिवसेनेकडून उमेदवारी?

शिर्डीत आता बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिर्डीचे शिवसेनेचे उमेदवार बबनराव घोलप यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं ३ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावलीय. त्यानंतर तिथं शिवसेना उमेदवार बदलण्याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले होते.

Mar 24, 2014, 12:43 PM IST

उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. विधानसभा मतदार संघनिहाय उद्धव ठाकरे महायुतीच्या प्रचाराचा आढावा घेणारेत.

Mar 24, 2014, 09:07 AM IST