शिर्डी

शरद पवारांची सेना नेतृत्वावर टीका

ज्या लोकांना कुटुंबासहित जेलमध्ये टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिले त्यांना शिवसेनेने तिकीट दिले असा आरोप करीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शिर्डी मधील सेनेचे उमेदवार बबनराव घोलप यांच्या उमेदवारीवरून भाजप सेनेवर टीका केलीये.

Mar 23, 2014, 08:51 AM IST

अण्णा हजारे उतरणार लोकसभेच्या रिंगणात!

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शिर्डीचे शिवसेना उमेदवार बबन घोलप आणि उस्मानाबादचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात प्रचार करणार आहेत. भ्रष्ट उमेदवारांना आणि त्यांना संधी देणाऱ्या पक्षांना जागा देणाऱ्या पक्षांना जागा दाखविण्याचा निर्धार अण्णांनी केलाय. अण्णांच्या या निर्धारामुळं निवडणुकीतली रंगत आणखी वाढलीय.

Mar 9, 2014, 08:58 PM IST

मी शिवसेना सोडणार नाही - खासदार वाकचौरे

शिवसेना सोडून आपण काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचं खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी स्पष्ट केलंय. शिर्डीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एवढंच नव्हे तर आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देखील मिळणार आहे, अशी चर्चा होती.

Feb 4, 2014, 08:04 PM IST

साईबाबांच्या दर्शनाची सशुल्क सेवा

शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढतच आहे. त्याचबरोबर व्हीआयपी पासवाल्यांचीही गर्दी वाढत होती.

Nov 17, 2013, 10:50 PM IST

साईंची शिर्डी उजळली दिव्यांनी!

दिपावली हा लक्षलक्ष दिव्यांनी आसमंत आणि धरती उजळून काढणारा उत्सव. शिर्डीतही दिपावलीचा उत्सव मोठया उत्साहानं साईभक्त साजरा करतात. वर्षातील सर्वात मोठा सण साजरा करण्यासाठी भक्त शिर्डीत येतात.

Nov 3, 2013, 09:44 AM IST

साई मंदिर आणि शिवसेना भवन उडवण्याची धमकी

शिर्डीतलं साई मंदिर तसंच मुंबईतलं शिवसेना भवन उडवून देण्याची धमकी देणारं पत्र साई संस्थानाला मिळालंय. दिवाळीमध्ये 9 नोव्हेंबरला साईबाबा मंदिर उडवून देणार असल्याचं पत्र संस्थानाला मिळालंय.

Oct 16, 2013, 09:06 AM IST

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित ताब्यात!

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी जारी केलेल्या दुसऱ्या रेखाचित्राशी मिळता-जुळता चेहरा असलेल्या असिफ नावाच्या एका इसमास शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांनी साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक- ४ समोरुन ताब्यात घेतलंय.

Sep 5, 2013, 01:11 PM IST

साईभक्तांसाठी आजपासून मोफत लाडूचा प्रसाद

साईभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिर्डीत साईभक्तांसाठी आजपासून मोफत बुंदी लाडूच्या प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. गुरुवार आणि स्वातंत्र्यदिनाचा आजचा मुहूर्त साधून दर्शन रांगेतच प्रसादाचं वाटप सुरू करण्यात आलं.

Aug 15, 2013, 02:52 PM IST

का करत होता `तो` भिकाऱ्यांची हत्या?

शिर्डीत सिरीअल किलरला गजाआड केल्यानंतर राहाता न्यायालयान त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सूनावलीय....कोठडीत पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच आरोपीन गुन्हा केल्याची कबूली देताना आपल खरं नाव राहण्याच ठिकाण तसच हत्या करण्यामागच कारणही स्पष्ट केलय...

Aug 10, 2013, 09:19 PM IST

भिकाऱ्यांच्या `सिरीयल किलर`ला अटक

शिर्डीतल्या तिहेरी हत्येप्रकरणी आज पोलिसांनी एका संशयितास अटक केलीय. संतोष रामदास अलकोल असं त्याचं नाव आहे. तो नगसरसुलचा राहणारा आहे.

Aug 9, 2013, 07:47 PM IST

शिर्डीमध्ये ६ भिकाऱ्यांची हत्या

शिर्डीत एकाच महिन्यात 6 भिका-यांची हत्या झाल्याचं उघड झाल्यानं दहशतीचं वातावरण पसरलंय. एकाच महिन्यात झालेल्या या हत्येमागे सीरियल किलरचा हात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Jul 29, 2013, 08:02 PM IST

शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाचा उत्साह

शिर्डीत गुरूपौर्णिमा उत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली आहे. साईनामाचा जयघोष करत शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.

Jul 21, 2013, 05:47 PM IST

... आणि चंद्रात दिसले शिर्डीचे साईबाबा!

‘चंद्राच्या प्रतिमेत साईबाबा दिसले... होय, होय चंद्राच्या प्रतिमेत साईबाबा दिसले…’ असा दावा काही भक्तांनी केला आणि हो हो म्हणता ही खबर साऱ्या गावात पसरली.

Jul 18, 2013, 01:45 PM IST

साईबाबांना २३ लाखांचा सुवर्ण मुकुट!

आंध्रप्रदेशातील हैंद्राबाद येथील साईभक्त आणि एस.व्ही.आर.या प्रवासी कंपनीचे मालक सुभाषचंद्र यानी आज शिर्डीच्या साईबाबांना ७०० ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे.

Jun 11, 2013, 06:25 PM IST

साईंच्या चरणी १ कोटी भाविक

यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या दोन महिन्यात शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी तब्बल 1 कोटी भाविकांनी साई दरबारी हजेरी लावली. दररोज तब्बल 1 लाखांवर भाविक साईबाबांचं दर्शन घेतात.

Jun 5, 2013, 09:57 PM IST