शिर्डी

मिनी बसने अचानक घेतला पेट

शिर्डी जवळच्या राहाता इथं आज अचानक एका मिनी बसनं पेट घेतल्यानं मोठा गोंधळ उडाला होता. या बसमध्ये एकही प्रवासी नसल्यानं जीवितहानी टळली.

Apr 16, 2013, 08:58 PM IST

शिर्डीच्या साईबाबा संस्थानाची कोटीच्या कोटी उड्डाणं

शिर्डीच्या साईबाबा संस्थानची स्थापना होवून तब्बल ९० वर्षांचा काळ लोटलाय. या काळात साईसंस्थानच्या उत्पन्नानं कोटीच्या कोटी उड्डाणं पार केली आहेत. स्थापनेवेळचे २३०० रुपये कुठे आणि या वर्षीचे केवळ रोख स्वरुपातील २७४ कोटी रुपये कुठे?

Feb 3, 2013, 10:00 AM IST

नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून

नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला असलेल्या काटवनातून पोलिसांनी काल (शुक्रवार) रात्री ताब्यात घेतला.

Jan 13, 2013, 12:12 AM IST

अर्जुन रणतुंगा साईबाबांच्या दर्शनाला

श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रंणतुंगानं सपत्नीक शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्याचा संस्थानच्या वतीनं सत्कार करण्यात आला.

Oct 31, 2012, 08:14 AM IST

अजय देवगण साईबाबांच्या चरणी

आगामी ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाच्या यशासाठी सिने अभिनेता अजय देवगण याने शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. या वेळी साईबाबांच्या समाधीवर ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाची ऑडीओ सी.डी. लावत त्याने साईंची मनोभावे पूजा केली.

Oct 5, 2012, 04:31 PM IST

गुरूपौर्णिमेसाठी सजली साईंची शिर्डी

दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त साईंची नगरी शिर्डी सजली आहे. तीन दिवस चालणा-या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे. पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांचा फोटो आणि साईचरित्राची द्वारकामाई मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

Jul 2, 2012, 08:41 AM IST

शिर्डीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी

सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे. याशिवाय प्रचंड गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवरही ताण पडला आहे.

May 20, 2012, 11:34 AM IST

वाळू माफियांविरोधात नागरिक रस्त्यावर

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरखाली चिरडल्याने एका सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपरच्या काचा फोडत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर डंपरचालक पसार झाल्याने स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं.

Apr 10, 2012, 05:24 PM IST

शिर्डी मंदिर परिसरात चोरी

शिर्डीत साई बाबा मंदिर परिसरात 95 हजार रुपयांची रोकड चोरीला गेलीयं. मंदिर परिसरातील कापडकोठीतून ही रक्कम पळवण्यात आलीये. विशेष म्हणजे प्रशासनाकडे याबाबत विचारपूस केली असता, या घटनेबाबत प्रशासनाने कानावर हात ठेवलेत

Apr 2, 2012, 12:47 PM IST

शिर्डी संस्थान बरखास्तीचे आदेश

शिर्डी संस्थान बरखास्तीचे आदेश देण्यात आले आहेत. औरंगाबाद खंडपीठानं हे आदेश दिले आहेत. औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयामुळं शिर्डीत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

Mar 13, 2012, 02:08 PM IST

साईबाबा संस्थान विश्वस्तांविरूध्द गुन्हा

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहता न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Mar 3, 2012, 02:52 PM IST

'साईंचा महिमा'... अंधांनाही वाचता येणार

अंध साईभक्तांना साईचरित्राची ओळख व्हावी, या हेतुने शिर्डीच्या साईबाबा संस्थानने एक अनोखं पाऊल उचललं आहे. साईचरित्राची आता ब्रेल लिपीमध्ये निर्मिती होणारं आहे.

Mar 2, 2012, 12:18 PM IST

साईमंदिराच्या पार्किंग लॉटमध्ये चोरी

शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील व्हीआय़पी पार्किंगमध्ये असलेल्या टोयाटा फॉर्च्युनरच्या गाडी चालकाचं लक्ष विचलीत करुन अज्ञात चोरट्यांनी गाडीतील ८ लाख ४० हजार रोख असलेली बॅग घेऊन पोबारा केला.

Jan 16, 2012, 08:29 AM IST

शिर्डीत हॉटेलमध्ये दाम्पत्याची आत्महत्या

बँकेच्या कर्जाला कंटाळून एका जोडप्यानं गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शिर्डीतल्या हॉटेल साई धनप्रतापमध्ये उघड झालाय. राजेंद्र आणि अर्जना निम्बेकर असं या दाम्पत्याचं नाव आहे.

Jan 7, 2012, 12:08 PM IST

उद्धव ठाकरेंनी केलं साई सच्चरित ग्रंथाचं उद्घाटन

मुंबईतल्या वांदे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आलेल्या साई सच्चरित ग्रंथ महापारायणाचं उदघाटन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. शिर्डीतल्या साईबाबा संस्थानच्या वतीनं १५ ते १८ डिसेंबर दरम्यान या महापारायणाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Dec 15, 2011, 10:35 AM IST