ऋतूचक्राचा केमिकल लोचा, गुलाबी थंडी गेली कुठे?
डिसेंबर महिना म्हणजे गुलाबी थंडी… पण हा अनुभव यंदा मात्र खोटा ठरलाय... राज्यभरात गारठ्याचा पत्ता नाही, उलट सूर्य आग ओकत असल्याचंच चित्र आहे... त्यामुळं नक्की कोणता ऋतू सुरू आहे. असा प्रश्न पडला असतानाच या कनफ्युजनमध्ये आणखी भर टाकलीय ती पावसानं.
Dec 2, 2013, 10:19 PM ISTहिवाळ्यातही कायम ठेवा तुमचा ट्रेन्डी लूक!
म्हणता म्हणता आता पावसाळाही संपत आलाय. म्हणजेच आता थंडीच्या दिवसांचेही वेध लागलेत. काहींणी तर थंडीच्या दिवसांत कुठे कुठे फिरायला जाता येईल, याचीही आखणी करायची सुरुवात केलीय. फिरायला जाणार म्हणजे फोटो आलेच... आणि फोटो आले म्हणजे आपला ट्रेंडी लूक तर त्यात दिसायलाच हवा... नाही का!
Sep 25, 2013, 07:58 AM ISTमुंबईत गारठा, १० अंशावर थंडीचा पारा
मुंबईत यंदाच्या वर्षी भरपूर थंडी पडलीय. मुंबईकरांना स्वेटर बाहेर काढावे लागलेत. मुंबईत चक्क दहा अंशापर्यंत पारा खाली आलाय.ऋतूचक्रानुसार मुंबईत हिवाळा दरवर्षी येतो. पण यंदाच्या हिवाळ्यानं मुंबईकरांना चांगलंच गारठून टाकलंय.
Jan 8, 2013, 06:14 PM ISTविदर्भात थंडी, शेतकरी आनंदी
गेल्या काही दिवसांत विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांत पारा दहा अंशाचा खाली घसरल्यानं ही थंडी रब्बी पिकांसाठी पोषक मानली जाते. त्यामुळं थंडीतही शेतक-यांच्या चेह-यावर समाधानाचे भाव आहे.
Dec 30, 2012, 09:18 PM ISTथंडीची लाट, फळांची वाट!
आंबाप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. सध्या राज्यभर पसरलेल्या थंडीच्या लाटेमुळं आंब्याचं उत्पादन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
Jan 11, 2012, 05:11 PM ISTमहाराष्ट्र गारठला
थंडीच्या लाटेनं महाराष्ट्र गारठलाय. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पारा सरासरीच्या खाली उतरलाय. अहमदनगरमध्ये सहा पूर्णांक चार अंश तपमानाची नोंद झालीय. सरासरीच्या तुलनेत तब्बल सहा अंशांनी पारा खाली उतरलाय.
Dec 26, 2011, 03:38 PM IST