court

विवाहापूर्वी 'सेक्स' अनैतिक, प्रत्येक धर्माला अमान्यच - कोर्ट

विवाहापूर्वी लैंगिक संबंध प्रस्थापित करणं ‘अनैतिक’ आणि ‘प्रत्येक धर्मानुसार चुकीचं’ असल्याचं मत दिल्लीच्या एका न्यायालयानं व्यक्त केलंय.

Jan 6, 2014, 08:37 AM IST

केवळ ३० पैशांसाठी... साडे पाच महिन्यांची शिक्षा!

२६ वर्षांपूर्वी केवळ ३० पैशांवरून झालेल्या एका वादात एका व्यक्तीला न्यायालयानं पाच महिने आणि वीस दिवसांची शिक्षा सुनावलीय.

Jan 1, 2014, 10:06 AM IST

`थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन`साठी बार मालकांची कोर्टात धाव

‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनसाठी राज्य सरकानं पहाटे पाच वाजेपर्यंत बार आणि हॉटेल्स सुरू ठेवायला परवानगी दिली आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी ही डेडलाइन रात्री दीड वाजेपर्यंत खाली आणल्यानं हॉटेल व्यावसायिकांची पंचाईत झालीय.

Dec 31, 2013, 10:31 AM IST

९ जणांचे बळी घेणाऱ्या संतोष मानेची फाशी कायम

बेदरकारपणे एस टी चालवून ९ जणांचे बळी घेणाऱ्या चालक संतोष माने याला दिलेली फाशीची शिक्षा कायम करण्यात आली आहे. संतोषची फाशीची शिक्षा आज पुणे सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली. खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, चोरी आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या गुन्ह्यांत त्याला आरोपी ठरविण्यात आले आहे.

Dec 11, 2013, 01:59 PM IST

‘हीट अँड रन’ सलमानला दिलासा, नव्यानं होणार सुनावणी

हीट अँड रन प्रकरणात यापुढं सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत नव्यानं खटला चालवला जाणार आहे. या संदर्भातला अर्ज सलमान खाननं सत्र न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयानं हा अर्ज मंजूर करून घेतलाय. त्यानुसार २३ डिसेंबरपासून नव्यानं खटल्याची सुनावणी होणार आहे.

Dec 5, 2013, 03:28 PM IST

दिल्लीमध्ये रामलीला रिलीज करण्यास नकार

निर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भंसाळीचा आगामी सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमात रणबीर सिंह आणि दीपिका पादुकोण आहेत. परंतु दिल्लीमधील एका न्यायालयाने हा सिनेमा रिलीज करण्यास नकार दिला आहे.

Nov 13, 2013, 03:46 PM IST

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी परवानगी

रायगड दिवेआगर इथलं सुवर्ण गणेश मंदिर नव्यानं बांधण्यासाठी अखेर मोक्का न्यायालयाची परवानगी मिळालीय. २४ मार्च २०१२ला या मंदिरावर दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम सोन्याचा गणेश मुखवटा आणि काही अलंकार लंपास केले होते. यावेळी २ पहारेकर्‍यांनाही ठार मारण्यात आलं होतं.

Oct 28, 2013, 09:57 AM IST

बीड जिल्हा बँक घोटाळा : धनंजय मुंडेंना एक कोटीचा धक्का

बीड जिल्हा बॅँक कर्ज थकबाकी प्रकरणात धनंजय मुंडे यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दणका दिलाय.

Oct 21, 2013, 05:34 PM IST

मुंबई गँगरेप : साक्ष देतानाच `ती`ची शुद्ध हरपली!

मुंबई गँगरेप प्रकरणाच्या आजच्या सुनावणीत पीडित फोटोजर्नलिस्ट तरुणीनं आरोपींना ओळखलंय. चार तास पीडित तरुणीची साक्ष सुरू होती. परंतु...

Oct 17, 2013, 11:33 PM IST

मुंबई गँगरेप : `ती`च्या आईचा कोर्टासमोर आकांत!

‘माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच माझ्या मुलीचा फोन आला आणि आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं’ असं तरुणीच्या आईनं यावेळी सांगितलंय.

Oct 16, 2013, 08:24 PM IST

`अल्ला... हा शब्द मुस्लिमांसाठी; इतरांनी तो वापरू नये`

‘अल्ला’ हा शब्द फक्त मुस्लिमांसाठीच आहे इतर धर्मियांना तो वापरता येणार नाही, असा धक्कादायक निकाल मलेशियातील एका कोर्टानं दिलाय. महत्त्वाचं म्हणजे, हा निकाल देणारे कोर्टाचे तीन जजही मुस्लिम धर्मीयच आहेत.

Oct 15, 2013, 04:58 PM IST

मीडियावर निर्बंध घालण्याची आसारामची मागणी

मीडियानं आपल्यासंबंधी नकारात्मक बातम्या देणं थांबवण्याचा आदेश देण्याचा आदेश देण्याची मागणी, सध्या तुरुंगात असलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूनं सर्वोच्च न्यायालयाकडे केलीय. सोळा वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आसाराम बापू सध्या तरुंगाची हवा खात आहे.

Oct 8, 2013, 04:29 PM IST

‘... अन्यथा तुझीही भंवरी देवी होईल’

राजस्थान सरकारमधल्या आणखी एका मंत्र्यांवर बलात्काराचा आणि धमकीचा गुन्हा दाखल झालाय. बलात्कार केल्यानंतर ‘या प्रकरणाची वाच्यता केली तर तुझीही भंवरी देवी होईल’ अशी धमकीही या मंत्र्यानं पीडितेला दिली होती.

Sep 19, 2013, 11:40 AM IST

कोर्टाच्या निर्णयाने २५० गावकरी होणार करोडपती!

हरियाणातील पंचकूला कोर्टाच्या निकालामुळे तीन गावांमधील तब्बल २५० गावकरी करोडपती बनले आहेत. या गावांमधील जमिनीवर रेसिंडेंशल सेक्टर बनवण्यात येणार आहेत.

Aug 14, 2013, 04:27 PM IST

बनावट चकमक : पांडेचं न्यायालयासमोर आत्मसमर्पण

सुप्रीम कोर्टानं जामीनअर्ज फेटाळल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आयपीएस अधिकारी पी.पी. पांडे यांनी सीबीआय न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलंय.

Aug 13, 2013, 02:20 PM IST