lok sabha elections

भाजपचा एक नंबर शत्रू काँग्रेस नव्हे शिवसेना, लोकसभेची तयारी सुरु

भारतीय जनता पार्टीने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे. परंतु यावेळेस काँग्रेस नव्हे तर शिवसेना पहिल्या क्रमांकाचा शत्रू असून लोकसभा निवडणूक शिवसेनेविरोधात लढण्याचा आदेश खुद्द पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. 

Jun 20, 2017, 07:11 PM IST

लोकसभा निवडणूक : भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, यशवंत सिन्हा यांचे चिंरजीव जयंत तर प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Mar 13, 2014, 09:20 PM IST

लोकसभा निवडणूक : काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 71 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.

Mar 13, 2014, 07:43 PM IST

भाजपला स्वत:चा भ्रष्टाचार दिसत नाही - राहुल

भाजपला स्वत:चा भ्रष्टाचार दिसत नाही, असा हल्लाबोल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींचा बेळगावात केला. भाजपच्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये जावं लागलं, असा चिमटा राहुल यांनी भाजपला काढला.

Feb 15, 2014, 03:13 PM IST

प्रियांकानं घेतली काँग्रेसची मिटींग; मोठी जबाबदारी पडणार?

प्रियांका गांधी यांनी मंगळवारी प्रियंका गांधींनी काँग्रेसची महत्त्वाची बैठक घेतली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत खुद्द राहुल गांधी उपस्थित नव्हते.

Jan 8, 2014, 08:01 AM IST

मला तिसऱ्यांदा पंतप्रधान पद नको - मनमोहन सिंग

आम्ही अनेक देश हिताचे निर्णय घेतले आहेत. मला कधीही राजीनामा द्यावासा वाटला नाही. मात्र, चार राज्यांतील निवडणुकीतील पराभवाला महागाई कारणीभूत ठरू शकते. मी नवीन व्यक्तीला पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितो. राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहेत, असे मत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. यावरून त्यांनी पंतप्रधान पद सोडण्याची तयारी दाखवून दिली आहे.

Jan 3, 2014, 11:50 AM IST

सेकंड इनिंग संपण्याआधी....पंतप्रधान आज बोलणार

२०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग प्रथमच आज पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच बोलणार आहेत. त्यातच पंतप्रधानपदाची सेकंड इनिंग संपण्याआधी ते मीडियाला सामोरे जात असल्यानं ते काय बोलतायत, याकडे सगळ्या देशाचंच लक्ष लागलंय.

Jan 3, 2014, 08:32 AM IST

राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, लोकसभेची चाचपणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दौ-यावर आहेत. या दौ-यात ते काही विकासकामांचं उदघाटन करणार आहेत. तर लोकसभेच्या उमेदवारांची चाचपणी करणार असल्याचे बोलले जात आहे.

Sep 4, 2013, 09:34 AM IST

काँग्रेसची नवी टीम, निवडणुकीसाठी सज्ज

आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने फिल्डींग लावली आहे. त्यासाठी २१ जणांची नवी टीम जाहीर करण्यात आलीय. मुंबईतले खासदार गुरुदास कामत यांच्यावर सरचिटीणीसपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

Jun 17, 2013, 07:05 AM IST