vote

नारायण राणेंनी मते खाल्ली पण...

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वांद्रे पूर्व मतदार संघात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत नेते बाळा सावंत यांना मिळालेल्या मतांपेक्षा या पोट निवडणुकीत तृप्ती बाळा सावंत यांना अधिक मते मिळाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ११ हजार ३२३ मते अधिक मिळाली आहेत.

Apr 15, 2015, 04:05 PM IST

राजधानीतील मराठी मतं जिंकण्याचा प्रयत्न

राजधानीतील मराठी मतं जिंकण्याचा प्रयत्न

Feb 6, 2015, 02:11 PM IST

अनिवासी भारतीयांनादेखील मतदानाचा अधिकार

अनिवासी भारतीयांना देखिल आता देशातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करता येणार आहे, ही प्रक्रिया आठ आठवड्यांत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अनिवासी भारतीयांना मतदानाचा हक्क देण्याच्या मागणीला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.

Jan 13, 2015, 07:56 AM IST

धोनी आणि दीपिका कुमारीची मतदानाला दांडी

जास्तच जास्त लोकांनी मतदान करावं, या हेतूने निवडणूक आयोगाने ज्या सेलिब्रिटींना ब्रॅण्ड एंबेसडर बनवलं होतं, त्यातील काही सेलिब्रिटींनी मतदानाला दांडी मारली आहे.

Dec 9, 2014, 02:26 PM IST

शिवसेना भाजप विरोधात मतदान करणार - रामदास कदम

शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहे. भाजपकडून ठोस भूमिका न घेतल्याने उद्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शिवसेना मतदान करणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी रात्री उशिरा दिली. त्यामुळे पुन्हा सुरु झालेली भाजपबरोबरची सकारात्मक चर्चा फोल ठरली आहे.

Nov 11, 2014, 11:50 PM IST

येवल्यात दुसऱ्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या महिलेला जाळले

येवल्यात लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडली. विशिष्ट उमेदवाराला मतदान केलं नाही, म्हणून एका महिलेला चक्क पेटवून देण्यात आलं. मात्र रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या या महिलेनं आपला जबाब फिरवल्यानं या घटनेतील गांभीर्य आणखीच वाढलंय.

Oct 17, 2014, 06:13 PM IST

राज्यात आतापर्यंत सरासरी 31 टक्के मतदान

राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 31 टक्के मतदान झालंय.  मुंबई, पुणे सारख्या महानगरांपेक्षा गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात मतदानाचा प्रचंड उत्साह दिसून येतोय. गेल्यावेळीही मुंबई आणि ठाण्यामध्येच अत्यल्प मतदान झालं होतं. तेव्हा मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो, घरात बसून राहू नका... घराबाहेर पडा, मतदान करा... आपला रेकॉर्ड सुधारण्याची हीच संधी आहे..

Oct 15, 2014, 03:56 PM IST