पंढरीची वारी

Ashadhi Ekadashi : पंढरीच्या वारीसाठी तुम्हीही विठ्ठल दर्शनाला येताय का? ही बातमी तुमच्यासाठीच...

Jun 15,2023

Ashadhi Ekadashi

Ashadhi Ekadashi : यंदा विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येताय? भाविकांसाठी मोठी बातमी

खास तरतुदी

राज्याच्या विविध भागांतून, खेड्यापाड्यातून विठ्ठलाच्या भेटीसाठी लाखोंच्या संख्येनं वारकरी पंढरपुरात येणार असून, या भाविकांसाठी शासनानंही खास तरतुदी केल्या आहेत.

अमृत महोत्सवी वर्ष

देशाच्या स्वातंत्र्याचं हे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळं यंदाच्या वर्षी एसटीनं प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत आणि महिला वर्गाला अर्धाच तिकिटखर्च करावा लागणार आहे.

चंद्रभागेच्या काठावर

आषाढीला चंद्रभागेच्या काठावर येत्या काही दिवसांध्ये येणाऱ्यांची संख्या वाढेल. त्यांच्यासाठी एसटी महामंडळाकडून 25 बसची सोय करण्यात आली आहे.

विठ्ठलभक्त

आषाढी एकादशी 29 जून रोजी असली तरीही त्याआधीपासूनच वारकरी आणि विठ्ठलभक्त पंढरीत दाखल होण्यास सुरुवात करतात. त्या सर्वांसाठीच 23 जूनपासून अतिरिक्त गाड्यांची सुविधा पुरवण्यात येईल.

प्रवास मोफतच

आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या खर्चात तिकिट दिलं जात होतं. आता मात्र त्यांचा हा प्रवास मोफतच होणार आहे. असा नियम लागू होणारी ही पहिलीच आषाढी असल्याचं सांगितलं जात आहे.

लाल परी जगात भारी!

मुख्य म्हणजे यंदाच्या वर्षी महिलांनाही प्रवासाच्या खर्चाचा फटका बसणार नाहीये. त्यामुळं लाल परी जगात भारी! असंच म्हणत ही सर्व मंडळी पंढरपुरात दाखल होणार आहेत असं म्हणायला हरकत नाही.

आषाढीची तयारी

सध्याच्या घडीला पंढरपुरात आषाढीच्या तयारीनं जोर धरला असून, येत्या काही दिवसांतच ही तयारी पूर्णत्वास जाईल.

कधी आहे आषाढी?

ज्यानंतर 29 जून म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रीविठ्ठलाची यथासांग शासकीय महापूजा होऊन वारकऱ्यांनाही पांडुरंगाचं दर्शन घेता येईल.

VIEW ALL

Read Next Story