आषाढी एकादशीला 'हे' उपाय केल्याने मिळेल विठुरायाचा आशीर्वाद


आषाढी शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. कारण धर्मशास्त्रानुसार यादिवशी भगवान विष्णू 4 महिने योगनिद्रात जातात असे म्हटले जाते.


विशेष म्हणजे एकादशीचे व्रत केल्याने संकटे दूर होतात आणि सुख समृद्धी मिळते अशी मान्यता आहे.


यावर्षी आषाढी एकादशी 17 जुलै 2024 ला साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची पूजा करा.


यादिवशी व्रत केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.


आषाढी एकादशीच्या दिवशी पूजा करताना पितळेच्या ताटात भगवान विष्णूची मूर्ती ठेवून पंचामृताने अभिषेक करावा.


देवाला नैवेद्य, फुले, धूप, फळे , मिठाई तर देवीला खीर अर्पण करा.


आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या मंत्राचा जर करून आरती करावी.


द्वादशीला एकादशीचे व्रत सोडावे. आषाढी एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे.

VIEW ALL

Read Next Story