आषाढी एकादशी दिवशी घरात बनवा सोप्या पद्धतीने कुरकुरीत साबुदाणा वडे. पाहा सोपी पद्धत
सर्व प्रथम बटाटे एका भांड्यात बारीक करून घ्या. यानंतर त्यात भिजवलेला साबुदाणा टाका.
धणे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि काळी मिरी घालून त्यांना मिक्स करून घ्या.
आता त्यात मीठ घालून मिक्स करा. यानंतर हाताला थोडे तेल लावून बटाटा-साबुदाणा मिश्रणाला वड्याचा आकार द्या.
यानंतर सेट करण्यासाठी त्याला फ्रिजमध्ये ठेवा. काही वेळानंतर कढईमध्ये तेल टाकून गरम करा.
तेल गरम झाल्यावर आता या तेलात बटाटा-साबुदाणा वडे गरम करा. वडा दोन्ही बाजूंनी नीट शिजवून घ्यावा.