आपल्या दमदार खेळानं टीम इंडियात स्वतःच स्थान निर्माण करणाऱ्या 'शुभमन गिल' चा आज 24 वा वाढदिवस आहे. कमी वयातच त्यानं मैदानावर अफलातून असे विक्रम बनवले आहेत.
शुभमन वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक मारणारा सर्वात लहान खेळाडू आहे. हा विक्रम होताना त्याचं वय 23 वर्ष 132 दिवस होतं. याआधी टीममधील त्याचाच खास मित्र ईशान किशन च्या नावे हा विक्रम होता.
भारतासाठी टी20 इंटेरनॅशनल मध्ये सेंचुरी मारणारा सर्वात लहान वयाचा खेळाडूही शुभमन आहे. 1 फेब्रुवारी 2023 ला 23 वर्ष 146 दिवस वय असताना न्यूझीलंड विरुद्ध त्याने हा विक्रम केला.
याचसोबत शुभमन क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट मध्ये सेंचुरी मारणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. हा विक्रमसुद्धा त्याने न्यूझीलंड विरुद्ध शतक झोडूनच आपल्या नावे केला.
2023 चा IPL हंगाम शुभमन साठी त्याच्या करियर च्या दृष्टिने खूप खास ठरला. त्याने 17 सामन्यांमध्ये 59.33 ची एवरेज आणि 157.80 च्या स्ट्राईक रेट ने 890 धावा बनवल्या.
त्याच्या याच कारगिरीमुळे यंदाच्या IPL मध्ये तो ऑरेंज कॅप मिळवणारा खेळाडू ठरला. सर्वात कमी वयाच्या ऑरेंज कॅप खेळाडूचा मानही त्यामुळे शुभमनला मिळाला.
IPL च्या इतिहासात सर्वात कमी वयात 700 धावा पूर्ण करण्याचा विक्रम शुभमननं याच वर्षी केला.
सध्या चालू असलेल्या आशिया कप मध्येही शुभमनने विक्रमांचा हा सिलसिला चालूच ठेवला आहे. वनडे च्या इतिहासात सर्वात वेगवान 1500 धावांचा टप्पा गाठणाऱ्या खेळाडूचा विक्रम त्यानं नेपाळविरुद्धच्या सामन्यात आपल्या नावे केला.
10 गिलनं 29 वनडे सामन्यांमध्ये 63.08 च्या एवरेजनं 1,514 धावा बनवल्या आहेत. तसंच शुभमनच्या नावे 29 सामन्यांत 4 शतकं आणि 7 अर्धशतकं आहेत.
याशिवाय त्यानं 18 कसोटी सामन्यांमध्ये 966 आणि 11 टी20 सामन्यात 304 धावा बनवल्या आहेत. या सर्व कामगिरीमुळं त्याची गणना आता जगातल्या महान खेळाडूंमध्ये व्हायला लागली आहे.