विराट कोहलीची लोकप्रियता

भारताचा स्टार क्रिकेटपटू विरोट कोहली जगभरात लोकप्रिय आहे. मैदानावर त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

Jun 19,2023

मैदानाबाहेर मोठा विक्रम

आता मैदानाबाहेरही त्याच्या नावावर एक मोठा विक्रम जमा झाला आहे. कमाईच्याबाबतीत कोहलीने 1 हजार कोटींचा टप्पा पार केला आहे.

एक हजार कोटींचा टप्पा पार

कमाईच्या बाबतीत विराट कोहलीने अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सना मागे टाकलं आहे. विराटची एकूण संपत्ती आता 1050 इतकी झाली आहे.

सोशल मीडियावर फॉलोअर्स

इंस्टाग्रामवरही विराट प्रचंड लोकप्रिय आहे. इन्स्टावर त्याचे जवळपास 2.5 मिलिअनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

कमाईत एक नंबरवर

स्टॉक ग्रोने दिलेल्या आकडेवारीनुसार क्रिकेटर्सच्या यादीत विराट कोहलीची कमाई सर्वाधिक आहे.

बीसीसीआयच्या ए+ श्रेणीत

बीसीसीआयच्या वार्षिक करारानुसार विराट कोहली ए+ श्रेणीत येतो. या श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात.

प्रत्येक सामन्यासाठी लाखो रुपये

याशिवाय प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15 लाख, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख, तर टी-20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात.

आयपीएलमध्येही तगडी कमाई

आयपीएलमध्ये विराट आरसीबी संघाकडून खेळतो आणि त्याची वार्षिक कमाई 15 कोटी रुपये इतकी आहे.

अनेक कंपन्यांच्या जाहीराती

क्रिकेट व्यतिरिक्त विराट तब्बल 18 कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. जाहिरातीच्या माध्यमातून त्याला कोट्यवधी रुपये मिळतात.

प्रत्येक जाहीरात कोट्यवधीत

प्रत्येक जाहीरातीसाठी विरोट 7.50 ते 10 कोटी रुपये मानधन घेतो. क्रीडा आणि बॉलिवूड क्षेत्रात जाहीरातीसाठी तो सर्वाधिक मानधन घेणारा सेलिब्रेटी आहे.

स्टार्टअपमध्ये गुंतवणूक

याशिवाय सात स्टार्ट-अप कंपन्यांमध्ये त्याने गुंतवणूक केली आहे. यात ब्ल्यू ट्राइब, युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिज, एमपीएल, स्पोर्ट्स कॉन्वो या कंपन्यांचा समावेश आहे.

सोशल मीडियातूनही कमाई

इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर प्रत्येक पोस्टसाठी विराट 8.9 आणि 2.5 कोटी रुपये घेतो. मुंबई आणि गुरुग्राममध्ये त्याचे अलिशान बंगले आहेत.

VIEW ALL

Read Next Story