भारतीय संघांत कोणाला संधी मिळणार?

भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्यासाठी चुरस असलेल्यांपैकी एका खेळाडूने केला धोनीचा उल्लेख

Swapnil Ghangale
Jun 07,2023

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आजपासून

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून म्हणजेच 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवला जाणार आहे.

7 ते 11 जून सामना

लंडनमधील ओव्हलच्या मैदानात 7 ते 11 जूनदरम्यान हा सामना खेळवला जाणार आहे.

दोन्ही संघांचा सराव

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ या सामन्याच्या पूर्वी सराव करत आहेत.

वेगवेगळी मतं

अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी कोणत्या 11 खेळाडूंना या अंतिम सामन्यात खेळवलं जावं यासंदर्भातील आपआपली प्लेइंग-11 निवडली आहे.

सलामीवर आणि तिसऱ्या क्रमाकांवर कोण?

रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीवीर म्हणून फलंदाजीला येतील अशी दाट शक्यता आहे. तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा फलंदाजीला येऊ शकतो.

चौथ्या क्रमांकावर विराट अन् पाचव्यावर...

चौथ्या क्रमांकावर विराट कोहली तर पाचव्यावर क्रमांकावर अजिंक्य रहाणे फलंदाजीला येण्याची शक्यता आहे.

जडेजा जवळजवळ निश्चित

दोन फिरकीपटूंना संधी देण्यात आली तर रविंद्र जडेजा आणि आर. अश्वीनला संधी मिळू शकते.

वेगवान गोलंदाजीची धूरा...

वेगवान गोलंदाजाची धुरा मोहम्मद शमीबरोबरच मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असेल.

तिसऱ्या गोलंदाजासाठी तिघांमध्ये स्पर्धा

तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून जयदेव उनाडकट, उमेश यादव आणि शार्दूल ठाकूरमध्ये स्पर्धा असेल.

विकेटकीपर कोण?

विकेटकीपर म्हणून इशान किशानला संधी मिळणार की के. एस. भरतला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

कोणाला संधी द्यावी याबद्दल मतभेद

इशान किशान आणि के. एस. भरत या दोघांपैकी नेमकी कोणाला संधी द्यावी याबद्दल लोकांमध्ये मतभेद आहेत.

भरत खेळलाय 4 सामने

के. एस. भरतने भारतीय संघासाठी 4 सामने खेळले असून एकूण 101 धावा केल्या आहेत. तो एकूण 90 प्रथम श्रेणी सामने खेळला आहे.

भारतासाठी एकही कसोटी खेळला नाही इशान

दुसरीकडे इशान किशानने अद्याप भारतासाठी एकही कसोटी सामना खेळला नसून तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केवळ 48 सामने खेळला आहे.

धोनीचा उल्लेख करत विधान

कोणत्या विकेटकिपरला संधी द्यावी यासंदर्भात संभ्रम असतानाच के. एस. भरतने धोनीचा उल्लेख करत एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

धोनीने दिला सल्ला

के. एस. भरतने नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये आपल्याला धोनीकडून विकेटकिपींगसंदर्भातील महत्त्वाच्या टीप्स मिळाल्याचं म्हटलं आहे.

बऱ्याच टीप्स दिल्या

आयपीएलदरम्यान मी धोनीबरोबर बरीच चर्चा केली. त्याने मला इंग्लंडमधील विकेटकिपींगच्या अनुभवासंदर्भात सांगत बऱ्याच टीप्स दिल्या असं के. एस. भरत म्हणाला.

मला त्याने बऱ्याच गोष्टी सांगितल्या

"त्याने मला विकेटकिपींगबद्दलच्या बऱ्याच महत्त्वाच्या आणि कामाच्या गोष्टी सांगितल्या. ही चर्चा खरोखरच फायद्याची ठरेल," असं के. एस. भरत म्हणाला.

VIEW ALL

Read Next Story