12 वी फेल या चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या आयपीएस मनोज कुमार शर्मा यांनी एका मुलाखतीमध्ये मुंबई पोलिसांच्या उमंग या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बॉलिवुडचे कलाकर किती मानधन घेतात याची माहिती दिली आहे.
आयपीएस मनोज कुमार शर्मा यांच्याकडे एकेकाळी मुंबईची उपनगरे, वांद्रे आणि अंधेरी ही त्यांच्या अधिकारक्षेत्रात होती. म्हणूनच, मुंबई पोलिसांचा वार्षिक कार्यक्रम उमंग आयोजित करताना त्यांनी अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत काम केले आहे.
उमंग नावाचा पोलिसांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी त्या भागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे असते. मुंबई पोलिसांसाठी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
उमंग 2023 डिसेंबरमध्ये झाला आणि त्यात अनन्या पांडे, आदित्य रॉय कपूर, रणवीर सिंग, शिल्पा शेट्टी, कियारा अडवाणी आणि करण जोहर आदींनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात शाहरुख आणि सलमानने त्यांच्या हिट गाण्यांवर परफॉर्म केले होते.
अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंग, शाहरुख खान सगळे जण येतात. हा कार्यक्रम पाच तास चालतो, अशी माहिती मनोज कुमार शर्मा यांनी दिली.
स्टार्ससोबत जवळून काम केल्यानंतर शर्मा यांना जाणवले की कलाकार किती नम्र आणि मेहनती आहेत. हे सर्वजण एक पैसाही न आकारता उमंगमध्ये हजेरी लावतात आणि परफॉर्म करतात, असा खुलासाही त्यांनी केला.
सगळे मोठे सेलिब्रिटी केवळ मुंबई पोलिसांच्या आमंत्रणाचा मान ठेवून या इव्हेंटला हजेरी लावतात. या इव्हेंटमध्ये येण्यासाठी ते कोणत्याही प्रकारची फी घेत नाहीत. फ्रीमध्ये ते हे फंक्शन अटेंड करतात, असे शर्मा म्हणाले.