हाच चतुर प्रत्यक्ष आयुष्यात कसा असेल हा प्रश्न अनेकांना पडला. 3 idiots फेम ओमी वैद्यचा जन्म अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे झाला होता.
2009 मध्ये त्यानं मिनल पटेल हिच्याशी लग्नगाठ बांधत नव्या जीवनाची सुरुवात केली. सोशल मीडियावर ओमी सहसा त्याच्या खासगी आयुष्याचे पैलू उलगडत असतो.
पीएचडीपर्यंतचं शिक्षण झालेली ओमी वैद्यची पत्नी व्यवसायानं काय करते याची माहिती अद्यापही उपलब्ध नाही. तिच्या चेहऱ्यावर असणारा सालस भाव सर्वांची मनं जिंकतो.
ओमीला दोन मुलंही आहेत. 2015 मध्ये त्याला पहिलं मुल झालं, तर 2018 मध्ये त्याच्या दुसऱ्या बाळाचा जन्म झाला.
मुलं आणि पत्नी अमेरिकेतच स्थायिक असल्यामुळं ओमीला वारंवाक भारत- अमेरिका असा प्रवास करावा लागत होता. ज्यामुळं त्यानं अमेरिकेत स्थायिक होण्याच निर्णय घेतला.
सध्या ओमी वेब सीरिजमधून झळकत असून, 'मेट्रो पार्क' असं त्याच्या वेब सीरिजचं नाव आहे. आतापर्यंत या सीरिजचे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
ओमी मुळचा गोव्याचा. सध्याच्या घडीला तो एक एडिटर, दिग्दर्शक, लेखक, निर्माता आणि एक कंटेंट क्रिएटरही आहे.
ओमीला एकाच प्रकारतच्या भूमिकांपुरता सीमित न राहता अभिनयाच्या कक्षा रुंदावायच्या होत्या. त्यासाठीच सध्या तो प्रयत्नशील दिसतो.