ऑनलाईन गेम आता तुमच्या स्मार्ट फोनमध्ये सहजपणे उपलब्ध होतात.मात्र एक काळ असा होता की, टीव्हीवर लागणाऱ्या कार्टून्सने 90 च्या दशकातील लहान मुलांना वेड लावलं होतं.
'द जंगलबुक बुक' हा अॅनिमेटेड सिनेमा अलीकडेच रिलीज झाला, मात्र 90 च्या दशकातील लहान मुलांच्या आवडीचं कार्टून होतं. 'जंगल जंगल राजा हमको पता चला है' हे गाणं, मोगली, बाळू आणि बघीरा हे आजही कायम आठवणीत आहेत.
मराठीमध्ये पहिलं कार्टून म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राजे महाराजे यांच्या गोष्टी बाहुल्यांच्या खेळातून सांगणारं मराठीतलं हे पहिलं कार्टून होतं. बाहुल्यांच्या माध्यमातून सोप्या गोष्टी यातून लहान मुलांपर्यंत पोहोचवल्या जात होत्या.
डकटेल्स या कार्टूनला 90 च्या दशकातील मुलांनी मोठ्या प्रामाणात पसंती दर्शवली होती. खजिन्याच्या शोधात असलेलं या कार्टूनला आजही सोशलमीडियावर तितकीच पसंती दिली जाते.
'टॉम अॅन्ड जेरी' या कार्टूनचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. लहान मुलांबरोबरच मोठी माणसं आजही हे कार्टून सोशलमीडियावर आवडीने बघतात.
तेनालीरामन हा एक विद्वान त्याच्या हुशारीने राजे आणि मंत्र्यांच्या योग्य सल्ला देणं आणि प्रश्नांची उत्तरं द्यायचा.
90 च्या दशकातील शक्तीमान ही अॅक्शन अॅनिमेटेड सिरीज होती. आजही हे कार्टून तितक्याच आवडीने पाहिलं जातं.
वॉल्ट डीस्ने यांनी साकारलेल्या मिकी माऊसवर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच वेड्यासारखं प्रेम करतात. मिकी माऊस, डोनाल्ड डक आणि गूफी हे कॅरेक्टर आजही तितकेच लोकप्रिय आहेत.
'में निन्जा हाट्टोरी आ गया हूँ' या गाण्याने सुरुवात कार्टूनची सुरुवात व्हायची. निन्जा हाट्टोरी कार्टूनमधले हाट्टोरी आणि त्याचे मित्र केनेची, युमिको, शिंजो, शिशिमानु यांनी 90 च्या दशकातील मुलांना वेड लावलं होतं.