मुंबईमध्ये राजकीय नेत्यांच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी आलेले राघव चढ्ढा अचानक स्टुडिओत गेले.
आज मुंबईमध्ये I.N.D.I.A आघाडीची तिसरी बैठक होणार आहे. 30 ऑक्टोबर आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे.
सत्ताधारी मोदी सरकारविरोध स्थापन केलेल्या या आघाडीच्या बैठकीत 60 हून अधिक नेते सहभागी होणार आहेत.
या बैठकीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही हजेरी लावणार आहेत.
आपचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय आपचे निलंबित खासदार संजय सिंह आणि राघव चढ्ढाही या बैठकीसाठी मुंबईत आले आहेत.
मात्र राजकीय बैठकीसाठी मुंबई आलेल्या राघव चढ्ढा यांना होणाऱ्या पत्नीला भेटण्याचा मोह टाळता आला नाही.
राघव चढ्ढा हे I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आल्यानंतर होणारी पत्नी म्हणजेच अभिनेत्री परिणिती चोप्राला सेटवर जाऊन भेटून आले.
वांद्रे येथील मेहबूब स्टुडीओमध्ये अभिनेत्री परिणिती चोप्रा एका जाहिरातीचं शुटींग करत असतानाच राघव चढ्ढा तिला भेटण्यासाठी अचानकच पोहोचले.
मे महिन्यामध्ये राघव चढ्ढा आणि परिणीतीचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर ते मध्यंतरी महाकालेश्वर मंदिरामध्ये देवदर्शनासाठीही गेले होते.