ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे काल प्रदीर्घ आजारानं निधन झाले. नाट्य तसेच सिनेसृष्टीतील त्यांचे योगदान हे मोठे होते.
अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ते सख्खे बंधू होते. यावेळी अभिनय बेर्डे यानं रवींद्र बेर्डे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात अभिनय आणि स्वानंदी त्यांना मिठी मारत आहेत.
'हार्टब्रोकरन' इमोजी त्यानं यावेळी पोस्ट केलाय. रवींद्र बेर्ड यांच्या निधनानं मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त करण्यात आला आहे.
रवींद्र बेर्डे यांनी तीनशेहून अधिक मराठी चित्रपटांतून कामं केली आहेत.
अगदी तरूण वयात ते नभोवाणीशी जोडले गेले होते.
1965 पासून आकाशवाणीवर नभोनाट्यांचे दिग्दर्शन करता करता त्यांचा नाट्यसृष्टीशी संबंध आला त्यानंतर 1987 त्यांनी पहिल्यांदा नाटकात काम केले.
त्यांच्या निधनानंतर अभिनेत्री हेमांगी कवी हिनं देखील एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 2008 साली आलेल्या 'धुडगूस' या मराठी चित्रपटानं तिनं त्यांच्या मुलीची भुमिका केली होती.
'होऊन जाऊ दे', 'हमाल दे धमाल', 'थरथराट', 'चंगु मंगु', 'उचला रे उचला', 'बकाल', 'डाकेबाज', 'गंमत जंमत ', 'झपाटलेला', 'भुताची शाळा' अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी कामं केली आहेत.