माझी बांधिलकी डाव्या विचारसरणीशी होती. तेथील मतांचे ध्रुवीकरण हळूहळू लक्षात आल्यानंतर मी डाव्या पक्षापासून दूर गेलो, असे पीयूष मिश्रा यांनी म्हटलं.
मी नंतर काँग्रेस, भाजप अशा सगळय़ाच पक्षांचे पाणी चाखले, तेव्हा लक्षात आले सगळे खारटच आहेत, अशा शब्दात पीयूष मिश्रा यांनी परखडपणे आपलं मत व्यक्त केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काम करण्याची पद्धत मला आवडते. ते नसते तर मी भाजपला मतदानही केले नसते. पंतप्रधान मोदी यांचा दृष्टिकोन मला आवडतो.
पंतप्रधानांच्या विरोधात उभे ठाकलेले राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात येते. मात्र मला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते, असे स्पष्ट मत पीयूष मिश्रा यांनी व्यक्त केले.
तुम्ही राजकारणासाठी बनलेले नाहीत, असे राहुल गांधी यांना संबोधताना त्यांना बेटा म्हणावेसे वाटते. ते छोटा भीम वाटतात, असेही पीयूष मिश्रा म्हणाले.
मी स्टार नाही. निर्माते ज्यांच्यावर पैसा लावतात ते स्टार असतात. मी तसा नाही, पण मी रॉकस्टार नक्कीच आहे, असेही पीयूष मिश्रा यांनी स्पष्टपणे सांगितले.
इस्रायलमध्ये मुलांना जसं सैनिकी शिक्षण सक्तीचे आहे, तसेच आपल्याकडे नाटक विषय हा किमान दोन वर्षे शालेय शिक्षणातील अभ्यासाचा भाग असायला हवा, असं स्पष्ट मत पीयूष मिश्रांनी मांडले.