मुकेश अंबानी आणि त्याचं कुटुंब हे होल्स्टीन -फ्रीजियन जातीच्या गाईचं दूध पितात.
ही गाय पुण्याच्या हाय-टेक भाग्यलक्ष्मी डेअरीमध्ये या गाई राहतात. ही डेअरी 35 एकरमध्ये इतक्या परिसरात आहे आणि तिथे 3000 पेक्षा जास्त गाई आहेत.
लक्षवेधी गोष्ट ही आहे की या गायींसाठी केरळवरून रबरची चटई मागवण्यात येते आणि त्यांना पिण्यासाठी RO वॉटर देण्यात येतं.
जगभरात सगळ्यात जास्त दूध या गाई देतात. ही गाय रोज 25 लिटर दूध देते आणि वर्षभरात 9500 लिटर दूध देते.
या गाईच्या बछड्याचं वजन हे 50 किलो असतं आणि गाईचं वजन हे जवळपास 750 किलो असतं.
या गाई कोणत्याही वातावरणात राहू शकतात. त्यामुळे जगात सगळीकडे डेअरी फार्मवर त्या दिसतात.
ही गाय कमी खाऊन जास्त दूध देते. शेतकऱ्यांसाठी ही गाय सगळ्यात फायदेकारक ठरु शकते.
या दूधात प्रोटीन, A1 आणि A2 बीटा कॅसिइन असतात. त्याशिवाय व्हिटामिन D मोठ्या प्रमाणात मिळतं.