बच्चन कुटुंबात कोण किती शिकलंय? जाणून घ्या

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Nov 23,2023

एवढे शिकलेत अमिताभ

अमिताभ बच्चन यांच्याकडे Bsc ची डिग्री आहे. त्यांनी नैनीतालच्या शेरवुड स्कूल आणि दिल्ली युनिव्हर्सिटीच्या किरोडीमल कॉलेजमध्ये प्रगती केली आहे.

अभिषेक एवढा शिकलाय

अमिताभ यांचा मुलगा अभिषेकने ऍक्टिंगमध्ये करिअर करण्याकरता ग्रॅज्युएशनमध्येच सोडून दिलं. मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर US ला गेला आणि बोस्टन युनिव्हर्सिटी ऍडमिशन घेतलं.

श्वेता बच्चन

रिपोर्टनुसार, अमिताभ यांची मुलगी श्वेताने बोस्टन युनिव्हर्सिटीमधून जर्नलिझममध्ये ग्रॅज्युएशन केलंय. तर शालेय शिक्षण हे स्विझरलँडमध्ये झालंय.

ऐश्वर्याचं शिक्षण

अमिताभ यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय DG रुपारेल कॉलेमध्ये शिकली आहे. तिला आर्किटेक्ट व्हायचं होतं. या कोर्ससाठी देखील ऍडमिशन घेतलं पण मॉडेलिंगमुळे ते अर्धवटच राहिलं.

जया बच्चन

अमिताभ बच्चन यांची पत्नी जया यांनी भोपाळच्या सेंट जोसेफ कॉन्वेंट शाळेतून शिक्षण पूर्ण केलं. FTII पुण्यातून ग्रॅज्युएशन केलं आहे.

नव्या नवेली

अमिताभ यांची नात नव्या नवेली ही बिझनेसवुमन आहे. तिच्याकडे डिजिटल टेक्नॉलॉजी आणि UX Design मध्ये फोर्डम युनिव्हर्सिटीची डिग्री आहे.

अगस्त्य नंदा

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा ग्रॅज्युएट आहे. साल 2019 मध्ये त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि आता 'द आर्चीस' मधून बॉलिवूड डेब्यू केला आहे.

कुणी अभिनेता तर कुणी बिझनेसमन

बच्चन कुटुंबात अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या आणि जया अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. तर श्वेता नंदा आणि मुलगी बिझनेस आणि रायटिंग फिल्डमध्ये आहे.

सर्वाधिक जास्त कमाई कुणाची

बच्चन कुटुंबात सर्वाधिक कमाई करणारे व्यक्ती म्हणजे अमिताभ बच्चन. रिपोर्टनुसार एका वर्षात 60 करोड रुपये कमावतात. नेट वर्थ 3390 करोड रुपयांची कमाई आहे.

VIEW ALL

Read Next Story